कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

शेतीची जमीन मोजण्यासाठी किती पैसे लागतात, अर्ज कसा आणि कुठे करावा लागतो? वाचा....

09:22 AM Nov 07, 2024 IST | Krushi Marathi
Jamin Mojani

Jamin Mojani : अलीकडील काही वर्षांमध्ये लागवड योग्य जमिनीचे प्रमाण आपल्या भारतात कमी झाले असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे आता लागवड योग्य जमिनीवर देखील शहरीकरण होऊ लागले आहे.

Advertisement

शहराजवळ ज्या जमिनी आहेत त्या शहरीकरणात अन औद्योगिकीकरणात जात आहेत. यामुळे शेतीच्या जमिनी कमी होत चालल्या आहेत. यामुळे जमिनीचे भाव अगदीच गगनाला भिडले आहेत.

Advertisement

या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या घडीला जमीन हा खूपच महत्वाचा मुद्दा बनला आहे. भविष्यात एक वेळ हाती पैसा असेल पण जमीन मिळणार नाही, असे चित्र भासत आहे. हेच कारण आहे की, जमिनीवरून मोठ्या प्रमाणात वादही होत आहेत.

न्यायालयात रोजच जमीनीबाबतची नवनवी प्रकरणे पाहायला मिळतात. जमिनीच्या छोट्या छोट्या हिस्स्यावरून वाद होतात, काही प्रकरणात तर मर्डरच्या घटनाही घडल्या आहेत. पण जमिनीचा वाद मिटवण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे शासकीय जमीन मोजणी.

Advertisement

जमीन मोजणीच्या माध्यमातून जमिनीबाबतचा वाद निकाली निघू शकतो. जमीन मोजणी केल्यामुळे आपली जमीन कुठून कुठपर्यंत आहे? हे लगेच समजते. पण, अनेकांच्या माध्यमातून शासकीय जमीन मोजणीसाठी किती पैसा खर्च करावा लागतो यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान आज आपण याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

Advertisement

अर्ज कसा करायचा?
शेत जमिनीची शासकीय मोजणी करायची असल्यास संबंधित तहसीलदार किंवा तालुका कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज विहित नमुन्यातील असायला हवा. हा अर्ज तुम्हाला https://emojni.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

या वेबसाईटवर केल्यानंतर तुम्ही अर्ज डाऊनलोड करून त्या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या. अर्जाची प्रिंट आउट काढल्यानंतर तो अर्ज काळजीपूर्वक भरा. अर्जात आपला तालुका, जिल्हा नमूद करावा.

खालील रकान्यात आपले संपूर्ण नाव, गाव, पिनकोडसहित मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर खालील रकान्यात मोजणी करण्यासंबंधीची माहिती, मोजणीचा प्रकार, गाव, वार्ड आणि शेतीचा गट नंबर नमूद करणे आवश्यक असते.

त्यानंतर मोजणी फीची रक्कम नमूद करावी, चलन पावती क्रमांक टाकावा. तसेच ७/१२ उताऱ्याप्रमाणे सहधारकांची नावे टाकावीत. त्यानंतर लगतचे कब्जेदार, त्यांचे नाव, पत्ते टाकावेत. जसे की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे तपशील द्यावेत. जसे की अर्ज, मोजणी फी चलन, ३ महाचे मिळकत पत्रिका, ३ महाचे आतील ७/१२ आणि अर्जाच्या शेवटी अर्जदाराचा सही किंवा अंगठा द्यावा.

अशा तऱ्हेने आपला अर्ज काळजीपूर्वक भरल्याच्या नंतर संबंधित अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा करावा. जमा झाल्यानंतर तुमच्या अर्जावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि एका ठराविक वेळेनंतर तुमच्या जमिनीची मोजणी पूर्ण होईल.

शासकीय जमीन मोजणी साठी किती पैसे लागतात
मिळालेल्या माहितीनुसार, एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क आकारलं जातं. मात्र, हे शुल्क वेळोवेळी बदलत असते.

यामुळे जमीन मोजणीसाठी किती फी लागते याबाबतचा तपास संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन करायला हवा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की साधी मोजणी करण्यासाठी अर्ज केला तर 6 महिन्याच्या आत,

तातडीची जमीन मोजणीसाठी अर्ज केला तर तीन महिन्यांच्या आत आणि अति तातडीची जमीन मोजणीसाठी अर्ज केला तर दोन महिन्यांच्या आत जमिनीची मोजणी होत असते. दरम्यान तुम्ही ज्या प्रकारच्या जमीन मोजणीसाठी अर्ज करणार असाल म्हणजेच साधी, तातडीची आणि अति तातडीची त्यानुसार तुम्हाला पैसे भरावा लागणार आहे.

Tags :
Jamin Mojani
Next Article