बँक ऑफ बडोदाच्या ‘या’ योजनेतील गुंतवणूक देईल तुम्हाला लाखोत परतावा! बँकेने आणली धमाकेदार योजना
BOB Liquid FD:- फिक्स डिपॉझिट स्कीम अर्थात मुदत ठेव योजना गुंतवणुकीसाठी खूप फायद्याच्या समजल्या जातात. गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि चांगला परतावा मिळवण्यासाठी फिक्स डिपॉझिट योजना या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार एफडी योजनांना मोठ्या प्रमाणावर पसंती देताना आपल्याला दिसून येतात.
अशा प्रकारच्या फिक्स डिपॉझिट योजना प्रत्येक बँक ऑफर करते व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम असा व्याजदर देखील देत असतात. आपल्याला माहित आहे की,तुम्ही किती कालावधीसाठी एफडी करत आहात त्यावर व्याजदर अवलंबून असतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला देखील एफडी करायची असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये करू शकतात.
त्यामधील प्रमुख कारण म्हणजे बँक ऑफ बडोदाने नुकतीच एक विशेष स्कीम आणली आहे व या स्कीमचे नाव आहे BOB लिक्विड एफडी असे आहे. यामध्ये ग्राहक एफडी खाते बंद न करता अंशतः या माध्यमातून पैसे देखील काढू शकता व ही सुविधा या योजनेत देण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाच्या या योजनेत कोणाला करता येते गुंतवणूक?
बँक ऑफ बडोदाच्या स्पेशल एफडी योजनेमध्ये एकल किंवा संयुक्त नावाच्या व्यक्ती आणि अल्पवयीन तसेच एचयुएफ म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंबे, एकल मालकी आणि भागीदारी संस्था, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित कंपन्या, ट्रस्ट तसेच क्लब आणि नोंदणीकृत सोसायटी व त्यासोबतच गैरव्यक्ती मुदत ठेवसाठी पात्र आहेत.
तसेच बँकेची ही योजना मात्र एनआरआय यांच्याकरिता उपलब्ध नाही. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे इंटरनेट बँकिंग आणि BOB वर्ड ॲप यासारखे डिजिटल चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकतात किंवा कोणत्याही शाखेत जाऊन सहजपणे याचे खाते उघडता येते.
किती गुंतवणूक करता येते?
BOB लिक्विड एफडीमध्ये कमीत कमी पाच हजार रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकतात व जास्तीत जास्त गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा यामध्ये नाही. गुंतवणुकीचा किमान कालावधी एक वर्ष असून जास्तीत जास्त कालावधी पाच वर्षाचा आहे.
व्याजदर जर बघितला तर बँक वेळोवेळी ठरवलेल्या मुदत ठेवीवरील प्रचलित व्याजदर यामध्ये लागू करते. सध्या यामध्ये तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवी किरकोळ ठेवी मानल्या जातील आणि तीन कोटी आणि त्यावरील ठेवी या रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मोठ्या प्रमाणातल्या ठेवी मानल्या जातील.
यामध्ये तुम्हाला जर योजनेची मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढायचे असतील किंवा अंशिक पैसे काढायचे असतील तर तशी सुविधा देखील उपलब्ध आहे व अशा पद्धतीने पैसे काढण्याची सुविधा एक हजार रुपयांच्या पटीत एफडीच्या कालावधी दरम्यान जेवढा वेळा आवश्यक आहे तितक्या वेळेस पैसे काढण्याची परवानगी दिली जाते.
या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा हवा आहे व त्यासाठी ते दीर्घ कालावधीसाठी पैसे ठेवू इच्छितात अशा लोकांसाठी खूप फायद्याची आहे. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी बचत आणि अनपेक्षित खर्चासाठी लवचिकता ठेवण्याची इच्छा ज्यांना आहे असे गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतात.