रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता! देशातील ‘या’ मार्गांवर धावणार आता आरक्षणाशिवाय रेल्वेगाड्या; वाचा वेळापत्रक आणि रूट
Railway Update:- भारतामध्ये रेल्वेचे जाळे खूप मोठ्या प्रमाणावर असून उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत रेल्वेचे नेटवर्क विस्तारलेले आहे. या सगळ्या मार्गांवर जर आपण बघितले तर दिवसाकाठी लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. दूरच्या प्रवासासाठी जास्त करून रेल्वेला पसंती दिली जाते व वेगवान प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास हा फायद्याचा ठरतो.
परंतु बऱ्याचदा रेल्वेने प्रवास करताना प्रवासी रिझर्वेशन म्हणजे आरक्षण करतात व त्यानंतर प्रवास करत असतात. मात्र आता प्रवाशांना देशातील काही मार्गांवर आरक्षणाशिवाय सहजपणे प्रवास करता येणार आहे.
म्हणजे देशातील ज्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या आहे या मार्गावर नवीन दहा गाड्या 20 जानेवारीपासून चालवल्या जाणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे व या गाड्यांमधून प्रवास करताना तिकीट काउंटरवरून सामान्य तिकीट खरेदी करावे लागणार आहे व आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे.
देशातील ‘या’ मार्गांवर धावणार आरक्षणाशिवाय रेल्वेगाड्या
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रवाशांच्या सोयी करता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून नवीन गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व नवीन गाड्या 20 जानेवारीपासून म्हणजेच कालपासून धावणार आहेत अशी माहिती समोर आलेली होती व देशातील ज्या रेल्वे मार्गांवर प्रवाशांच्या संख्या जास्त प्रमाणात असेल त्या मार्गावरच या गाड्या चालवल्या जातील असे देखील सांगण्यात आलेले आहे.
जर या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना रेल्वे स्टेशन वरील तिकीट काउंटरवरून जनरल म्हणजे सामान्य तिकीट खरेदी करणे गरजेचे राहील व याशिवाय यूटीएस ॲपच्या माध्यमातून देखील तिकीट बुकिंग करता येणार आहे. या नवीन रेल्वे गाड्यांमध्ये सामान्य आणि आसन श्रेणीचे बोगी म्हणजे डबे असणार आहेत.
या सुविधेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा याकरिता या रेल्वे गाड्यांचे भाडे देखील सामान्य गाड्यांच्या तुलनेमध्ये खूपच कमी प्रमाणात ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला जर दिल्लीहून जयपुरला प्रवास करायचा असेल तर जनरल डब्याचे भाडे 150 आणि आसन श्रेणीसाठी तीनशे रुपये इतके दर ठेवण्यात आलेले आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार या गाड्या?
1- मुंबई-पुणे सुपरफास्ट- राज्यातील मुंबई आणि पुणे या दरम्यान मुंबई पुणे सुपरफास्ट ही गाडी धावणार असून मुंबईवरून सकाळी साडेसात वाजता प्रस्थान करेल व पुण्याला सकाळी 11 वाजता पोहोचेल.
2- दिल्ली-जयपूर एक्सप्रेस- दिल्ली ते जयपूर या मार्गावर एक्सप्रेस धावणार असून दिल्लीवरून ती सकाळी सहा वाजता निघेल व दुपारी दीड वाजता जयपूरला पोहोचेल.
3- हैदराबाद-विजयवाडा एक्सप्रेस- ही एक्सप्रेस हैदराबाद वरून सकाळी साडेसात वाजता निघेल व दुपारी बारा वाजता विजयवाड्याला पोहोचेल.
4- कोलकत्ता-पटना इंटरसिटी- पश्चिम बंगालमधील कोलकत्ता ते बिहार मधील पटनादरम्यान ही इंटरसिटी एक्सप्रेस धावणार असून कोलकत्या वरून सकाळी पाच वाजता प्रस्थान करेल आणि दुपारी दोन वाजता पटना या ठिकाणी पोहोचेल.
5- लखनऊ-वाराणसी एक्सप्रेस- उत्तर प्रदेशमध्ये धावणारी ही लखनऊ ते वाराणसी एक्सप्रेस सकाळी सात वाजता निघेल व दुपारी दीड वाजता वाराणसीला पोहोचेल.
6- अहमदाबाद-सुरत सुपरफास्ट- ही एक्सप्रेस सकाळी सात वाजता अहमदाबाद स्टेशनवरून प्रस्थान करेल व दुपारी साडेबारा वाजता सुरत स्टेशनला पोहोचेल.
7- जयपुर-अजमेर सुपरफास्ट- राजस्थानमध्ये महत्त्वाचे असलेल्या जयपूर व अजमेर या शहरांसाठी ट्रेन असून जयपुर वरून सकाळी आठ वाजता निघेल व सकाळी साडेअकरा वाजता अजमेरला पोहोचेल.
8- पटना-गया एक्सप्रेस- बिहार राज्यातील पटना येथून हे ट्रेन सकाळी सहा वाजता निघेल व सकाळी साडेनऊ वाजता गया स्टेशनला पोहोचेल.
9- भोपाल-इंदोर इंटरसिटी- मध्यप्रदेश राज्यातील भोपाल व इंदोर यादरम्यान ही एक्सप्रेस जाणार असून भोपालवरून सकाळी साडेसहाला निघेल व इंदूरला दुपारी बाराला पोहोचेल.
10- चेन्नई-बेंगलूरू एक्सप्रेस- ही एक्सप्रेस चेन्नई वरून सकाळी आठ वाजता निघेल व दुपारी साडेतीन वाजता बंगलोरला पोहोचेल.