Indian Railway Rule: ट्रेन चुकली? त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येईल का? जाणून घ्या रेल्वेचा नियम!
Indian Railway Rule:- रेल्वेने प्रवास करताना अनेकदा असे होते की, वेळेवर रेल्वे स्थानकावर पोहोचता येत नाही आणि ट्रेन सुटते. अशा वेळी अनेक प्रवाशांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, त्यांनी काढलेल्या तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करता येईल का किंवा त्यांनी तिकिट काढले असूनही प्रवास न झाल्यास त्याचा रिफंड मिळेल का? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
भारतीय रेल्वेचे नियम
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, जर तुमच्याकडे कन्फर्म तिकिट असेल आणि तुम्ही कोणत्याही कारणामुळे ट्रेन पकडू शकला नाही, तर त्या तिकिटावर दुसऱ्या कोणत्याही ट्रेनने प्रवास करता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन तिकिट काढणे अनिवार्य असते. कोणत्याही प्रकारचे जुन्या तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवेश मिळत नाही. जर तुमची ट्रेन चुकली, तर तुम्हाला नवीन तिकिट बुक करावे लागते आणि त्याशिवाय पुढील प्रवास शक्य होत नाही.
तिकिटाचे पैसे परत मिळण्यासंदर्भातले नियम
तिकिटाचे पैसे परत मिळण्यासंदर्भातदेखील भारतीय रेल्वेने ठरावीक नियम ठरवले आहेत. जर तुमची ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी तुम्ही तिकिट रद्द केले, तर काही शुल्क वजा करून उर्वरित रक्कम तुम्हाला परत मिळते. मात्र, जर ट्रेन सुटल्यानंतर तुम्ही रिफंडसाठी अर्ज केला, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे प्रवासाच्या आधी वेळेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण देशातील सर्व रेल्वेगाड्यांवर हेच नियम लागू होतात.
ट्रेन चुकल्यास काय कराल?
ट्रेन चुकल्यास घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तात्काळ IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा रेल्वे स्थानकावरील आरक्षण काउंटरवर जाऊन पुढील ट्रेनसाठी नवीन तिकिट बुक करू शकता. नवीन तिकिटाशिवाय तुम्हाला पुढील प्रवासाची परवानगी दिली जात नाही. जर तुम्ही नवीन तिकिट काढू शकला नाही आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये बसला, तर ट्रेनमध्ये असलेल्या टीटीई (ट्रॅव्हलिंग टिकट एग्जामिनर) यांच्याशी संपर्क साधा.
जर त्या ट्रेनमध्ये रिकामी जागा उपलब्ध असेल, तर अतिरिक्त शुल्क भरून तुम्हाला सीट मिळू शकते. मात्र, हे पूर्णपणे टीटीईच्या अधिकारात असते आणि सीट उपलब्धतेवर अवलंबून असते. त्यामुळे, ट्रेन चुकल्यास तात्काळ नवीन तिकिट काढणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ट्रेन सुटल्यानंतर त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही आणि रिफंड मिळत नाही, त्यामुळे वेळेवर स्टेशनवर पोहोचणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.