🚦 पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! 🚩 शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत झाले हे बदल 🚗
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती निमित्त पुणे शहरात महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले असून पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांनी प्रवासाची पूर्वयोजना करून आवश्यक त्या मार्गांचा वापर करावा. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून वाहतुकीचा ताण कमी करण्यास सहकार्य करावे. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि सुकर प्रवास करावा.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. विशेषतः, लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि केळकर रस्ता यांसारख्या प्रमुख मार्गांवर याचा परिणाम होणार आहे.
‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचा मार्ग आणि वाहतुकीतील बदल
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून आयोजित ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सुरू होऊन, स. गो. बर्वे चौक, एसएसपीएमएस कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मॉडर्न चौक, झाशी राणी चौक, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत जाणार आहे.
वाहतूक बंद असणार असलेले रस्ते (सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत)
जंगली महाराज रस्ता
Advertisement- संचेती हॉस्पिटल चौक ते खंडोजी बाबा चौक पर्यंत वाहतूक आवश्यकतेनुसार बंद राहील.
- पर्यायी मार्ग: सीओईपी चौकातून डावीकडे वळून कामगार पुतळा मार्गे, जवाहरलाल नेहरू रस्ता व महात्मा गांधी रस्त्याने इच्छित स्थळी जाता येईल.
फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता
Advertisement- खंडोजी बाबा चौक ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत) वाहतूक आवश्यकतेनुसार बंद राहील.
- पर्यायी मार्ग: एसएनडीटी कॉर्नरमार्गे, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, आणि नळस्टॉप चौकमार्गे वाहने वळवली जातील.
लोकमान्य टिळक रस्ता
- लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीज) ते खंडोजी बाबा चौक वाहतूक बंद राहील.
- पर्यायी मार्ग: लालबहादूर शास्त्री रस्त्याने सेनादत्त चौक व नळस्टॉप चौकामार्गे वाहनांची वाहतूक केली जाईल.
केळकर रस्ता
- झेड ब्रिजमार्गे डेक्कनला जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद केली जाईल.
- पर्यायी मार्ग: गरुड गणपती चौक, लोकमान्य टिळक चौक, लालबहादूर शास्त्री रस्त्याने पर्यायी वाहतूक सुरू राहील.
भिडे पूल
- डेक्कनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद राहील.
- पर्यायी मार्ग: झेड ब्रिज, गरुड गणपती चौक, लोकमान्य टिळक चौक, लालबहादूर शास्त्री रस्त्याने वाहनांची वाहतूक केली जाईल.
वाहन पार्किंग व्यवस्था
- संगमवाडी पार्किंग: खडकी, येरवडा आरटीओ कार्यालयातून येणाऱ्या वाहनांसाठी.
- नदीपात्र पार्किंग: कर्वे रस्ता, कोथरूड कडून येणाऱ्या वाहनांसाठी (अलका टॉकीज चौकातून).
- कृषी महाविद्यालय पार्किंग: सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पाषाण, बाणेर मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी.
- व्हीआयपी आणि संयोजक वाहनांसाठी: फर्ग्युसन महाविद्यालयातील पार्किंग उपलब्ध.
शिवजयंती मुख्य मिरवणूक वाहतूक बदल (सकाळी ६ पासून गर्दी संपेपर्यंत)
शहरातील प्रमुख मार्गांवरून शिवजयंती मुख्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याने, खालील मार्गांवर वाहतुकीत बदल केले जातील:
जिजामाता चौक - छत्रपती शिवाजी महाराज रस्ता - स्वारगेट मार्ग
- वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौक, लोकमान्य टिळक रस्ता मार्गे वळवली जातील.
स. गो. बर्वे चौक - पुणे महापालिका भवन मार्ग
- वाहने जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळवली जातील.
गणेश रस्ता - दारूवाला पूल - जिजामाता चौक मार्ग
- वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळवली जाईल.
केळकर रस्ता - अप्पा बळवंत चौक - जोगेश्वरी मंदिर चौक - बुधवार चौक मार्ग
- वाहतूक आवश्यकतेनुसार बंद केली जाईल.
लक्ष्मी रस्ता - सोन्या मारुती चौक - संत कबीर चौक मार्ग
- लक्ष्मी रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहने संत कबीर चौकामार्गे वळवली जातील.
पूरम चौक - बाजीराव रस्ता - शिवाजीनगर मार्ग
- वाहने लोकमान्य टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौकातून फर्ग्युसन महाविद्यालय मार्गे वळवली जातील.
अप्पा बळवंत चौक - बुधवार चौक - बाजीराव रस्ता - फुटका बुरुज मार्ग
- वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे वळवली जातील.
गाडगीळ पुतळा - शनिवारवाडा मार्ग
- वाहतूक स्वातंत्र्यवीर सावरकर भवन पूल, बालगंधर्व नाट्यगृह, टकले हवेली चौक मार्गे वळवली जाईल.
शिवजयंती उत्सवामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा आणि शिवजयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा!