बुलेट ट्रेन विसरा, आता 600 किमी प्रति तास वेगाने धावणारी हायपरलूप ट्रेन सुरु होणार ! पहिली ट्रेन पुण्याला मिळणार, वाचा डिटेल्स
Hyperloop Train : भारतात एकीकडे बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे आता बुलेट ट्रेन पेक्षा वेगवान ट्रेन येत्या काही महिन्यांनी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर चालवली जाणार आहे.
सध्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यांनी हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास वेगवान होणार आहे. अशातच आता हायपरलूप ट्रेन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
देशातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक पूर्णपणे तयार झाला असून हा ट्रॅक आयआयटी मद्रासमध्ये तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकचे अंतर ४१० मीटर एवढे आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे.
दरम्यान हायपरलूप ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांना तब्बल 600 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. ही ट्रेन मुंबई ते पुणे दरम्यान सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या मार्गावर ही ट्रेन सुरू झाल्यास मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त आणि फक्त 25 मिनिटात पूर्ण होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा प्रकल्प राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. भारतातील वाहतूक तंत्रज्ञानात या प्रकल्पामुळे नवा अविष्कार येणार असा दावा जाणकार लोक करत आहेत.
मात्र चाचणी फेरीत असलेला हा प्रकल्प व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य बनवणेही तेवढेच महत्त्वाचे राहणार आहे. यामुळे हा प्रकल्प व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
तसेच जरी ही ट्रेन सुरू झाली तरी याचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे ठरतील का? ही देखील गोष्ट महत्त्वाची राहणार आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाबाबत बोलायचं झालं तर हायपरलूप एक असे तंत्रज्ञान आहे जे एका विशेष कॅप्सूल किंवा पॉड्समधून वाहतूक करते.
स्टीलच्या नळ्याद्वारे ६०० ते १२०० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने चुंबकाद्वारे हे कॅप्सूल चालविले जाते. हायपरलुप ट्रेन प्रवासी वाहतुकीसाठी सुरू झाल्यास भारत हा एकमेव देश ठरणार जिथे या ट्रेनचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी होतोय.