स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने धरली कुक्कुटपालनाची वाट! अक्षय भाऊ पोल्ट्री मधून कमावतो वार्षिक 30 लाख
Poultry Farming Business:- एक काळ असा होता की नोकरीपेक्षा शेती भारी व आताचा काळ असा आहे की,शेतीपेक्षा नोकरी भारी व त्यामुळे आता बहुतेक तरुण-तरुणी उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. परंतु आता सुशिक्षित तरुणांची संख्या आणि त्या मानाने उपलब्ध नोकऱ्या खूपच कमी असल्याने परत शेतीकडे तरुणांचा ओढा किंवा संख्या वाढताना आपल्याला दिसून येत आहे व हे चित्र नक्की सकारात्मक असे आहे.
शेती आणि शेतीशी निगडित असलेले व्यवसायांमध्ये आता तरुण मोठ्या प्रमाणावर प्रगती करत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने नोकरीपेक्षा जास्त यश व्यवसायांमधून मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण नांदेड जिल्ह्यातील आशिष आडके या तरुणाची यशोगाथा बघितली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे व इतर तरुणांना देखील खूप प्रेरणा देणारी आहे.
आशिष आडके अशा पद्धतीने वळला पोल्ट्री व्यवसायाकडे नांदेड शहरातील विजयनगर परिसरामध्ये राहणारा आशिष आडके यांचे शिक्षण समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी पर्यंत झालेले आहे. साहजिकच त्यानंतर मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व अधिकारी व्हावे हे स्वप्न मनाशी असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली.
स्पर्धा परीक्षाची तयारी करता यावी म्हणून आशिषने पुणे गाठले व त्या ठिकाणी राहून अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु यश मात्र काही मिळाले नाही. सलग तीन वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला व शेवटी ते सोडून आशिष आडके तीन वर्षांनी पुन्हा गावी परतला.त्यानंतर एका खाजगी संस्थेमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली.
परंतु आशिषने ठरवले की खाजगी ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.त्यानंतर मध्यंतरी कोरोनाचा कालावधी आला व दीड ते दोन वर्षे आशिष घरीच राहिला.
परंतु या रिकाम्या वेळेमध्ये मोबाईलवर विविध व्यवसायांची माहिती मिळवायला सुरुवात केली व या माहिती मिळवण्याच्या कालावधीतच आशिषला कुक्कुटपालन या व्यवसायाची माहिती मिळाली व कमी वेळ जास्त पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय असल्याचे त्याला समजले व त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अशाप्रकारे सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा पैसा उभारणे हे एक आव्हान होते व याकरिता घरातील काही पैसे वापरले व बँकेचे कर्ज घेऊन नांदेड जवळ एका शेतामध्ये 2023 ला कुक्कुटपालनासाठी शेड बांधकाम सुरू केले.
व्यवस्थित नियोजनाने तो व्यवसाय वाढीस लावण्यावर भर दिला व आज एक एकर जागेवर दहा हजार फुटांचे पोल्ट्री शेड आशिषने उभारले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या शेडमध्ये कोंबड्यांना उबदार ठेवण्यासाठी आवश्यक असलेले हिटर तसेच विविध प्रकारची दिवे, कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य पुरवण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा तसेच पाण्याची डिस्पेन्सर,
थंडाव्यासाठी इन्व्हर्टर आणि उन्हाळ्यासाठी वीज उपलब्ध व्हावी याकरिता सगळ्या सोयी या शेडमध्ये उभारण्यात आलेले आहेत. एकावेळी 15000 कोंबड्यांचे संगोपन करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आशिषने पोल्ट्री फार्ममध्ये उभारली आहे. एका वर्षात साधारणपणे सहा बॅच काढल्या जातात व एक बॅच विक्रीयोग्य होण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागतो.
त्यानंतर त्या कोंबड्यांची विक्री केली जाते. आज जर आशिष आडके याचा या पोल्ट्री फार्म मधूनची मिळणाऱ्या कमाईचा विचार केला तर ती वर्षभरात तीस लाख रुपये इतकी आहे.
अशाप्रकारे आपण मनात वाढलेले स्वप्न जर पूर्ण झाले नाही तर निराश न होता दुसरा मार्ग अवलंबून त्यात यशस्वी होणे खूप महत्त्वाचे असते हे आशिष आडके यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.