पाऊस अजून गेलेला नाही ; महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता! हवामान खात्याचा अलर्ट
Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने आजही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडीने जारी केला आहे. खरेतर, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण कमी झाले असून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कोकणात सुद्धा पावसाने हजेरी लावलीये. दरम्यान आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बांगलादेश आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बांगलादेश आणि पश्चिम बंगाल लगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. एवढेच नाही तर लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रातील हवामान बिघडले आहे. आज राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र उद्यापासून महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा एकदा आता थंडीची तीव्रता वाढणार असे दिसते. उद्या 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील आणि कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्यातील काही तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
तत्पूर्वी आज मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकार लोकांनी केले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आठ डिसेंबर रोजी राज्यातील खानदेश विभागातील धुळे, जळगाव, पश्चिम महाराष्ट्र विभागातील सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
या ठिकाणी अगदीच हलका पाऊस होणार असे दिसते. कारण की भारतीय हवामान खात्याने यापैकी कोणत्याचं जिल्ह्याला अलर्ट जारी केलेला नाही. मात्र असे असले तरी या संबंधित दहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडणार अशी शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.