कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

हरभऱ्याच्या एकरी 18 क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या टॉप 3 सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता !

03:50 PM Oct 09, 2024 IST | Krushi Marathi
Harbhra Lagwad

Harbhra Lagwad : येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी होईल अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही यंदा हरभरा लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण हरभऱ्याच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

हरभऱ्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

Advertisement

विजय : विजय हा हरभऱ्याचा एक सुधारित वाण आहे. ही एक जुनी व्हरायटी आहे. हि व्हरायटी कोरडवाहू भागासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. यासोबतच ही व्हरायटी बागायती भागासाठी देखील चांगली फायदेशीर ठरते.

कोरडवाहू क्षेत्र असो किंवा बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर या जातीपासून एकरी 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळवता येऊ शकते. या जातीच्या 100 दाण्यांचं वजन हे 15 ते 16 ग्रॅम भरते.

Advertisement

फुले विश्वराज : तुम्हाला कोरडवाहू भागात हरभरा लागवड करायची असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि विकसित केलेली ही नवीन व्हरायटी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ही जात 2020 मध्ये प्रसारित करण्यात आली आहे.

Advertisement

कोरडवाहू भागासाठी ही जात सर्वात बेस्ट ठरते. कोरडवाहू भागात जर याची लागवड केली तरी हेक्‍टरी 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. याच्या 100 दाण्यांचं वजन हे 20 ते 22 ग्रॅम एवढे भरते.

दिग्विजय : तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल, बागायती भागासाठी तुम्ही हरभरा पेरणी करण्याच्या विचारात असाल तर दिग्विजय हा वाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. बागायती भागासाठी आणि उशिरा पेरणीसाठी आवाहन सर्वात बेस्ट असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी सतरा क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असे कृषी तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर तुम्ही बागायती भागात हरभरा लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हरभऱ्याचा हा नवीन सुधारित वाण फायद्याचा ठरणार आहे.

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळू शकते. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचे आणि खताचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर या जातीची लागवड शेतकऱ्यांना नक्कीच मोठा नफा मिळवून देणार आहे.

Tags :
Harbhra Lagwad
Next Article