कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हरभऱ्याच्या 'या' जातीचा राजपत्रात समावेश, हरभऱ्याच्या नव्या जातीच्या विशेषता पहा

10:22 AM Nov 06, 2024 IST | Krushi Marathi
Gram Farming

Gram Farming : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांना रब्बी हंगामात हरभरा पेरणी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या परभणी चणा १६ (बीडीएनजी २०१८-१६) या हरभऱ्याच्या जातीचा राजपत्रात समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशीनुसार हा वाण भारताच्या राजपत्रात समाविष्ट करण्यात आला असून आता ही जात देश पातळीवर प्रसारित होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे या वाणांचे बीजोत्पादन हे मुख्‍य बियाणे साखळीमध्ये घेता येणार आहे.

Advertisement

दरम्यान आज आपण हरभऱ्याच्या या अलीकडेच विकसित झालेल्या सुधारित जातीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या जातीच्या विशेषता नेमक्या काय आहेत, शेतकऱ्यांना या जातीपासून किती उत्पादन मिळू शकते? या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.

परभणी चणा-१६ (बीडीएनजी २०१८-१६) वाणाच्या विशेषतः खालील प्रमाणे
परभणी चणा-१६ (बीडीएनजी २०१८-१६) हा हरभऱ्याचा एक अलीकडेच विकसित झालेला सुधारित वाण. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने ही जात विकसित केली आहे.

Advertisement

कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने हा वाण विकसित केला असून महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आलाय. हा एक सरासरीपेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण आहे.

Advertisement

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जात पेरणी केल्यानंतर ११० ते ११५ दिवसांत परिपक्व होते. या जातींचे दाणे हे टपोरे असतात. शंभर दाण्याचे वजन २९ ग्रॅम एवढे भरते. ही जात मर रोगास सुद्धा प्रतिकारक आहे.

या जातीच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी असल्याचा दावा केला जातोय. या जातीपासून विक्रमी उत्पादन तर मिळतेच शिवाय या जातीला बाजारात मोठी मागणी देखील असते. यामुळे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. जर तुमचाही हरभरा लागवडीचा प्लॅन असेल तर या जातीची तुम्ही निवड करू शकता.

Tags :
gram farming
Next Article