For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

NA Rule: शेत जमिनीवर घर बांधण्यासाठी नवीन नियम.. ‘ही’ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल! नाहीतर नुकसान अटळ

12:31 PM Feb 26, 2025 IST | Krushi Marathi
na rule  शेत जमिनीवर घर बांधण्यासाठी नवीन नियम   ‘ही’ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल  नाहीतर नुकसान अटळ
na rule
Advertisement

Government Rule Of NA:- गावाकडे स्वतःच्या शेतात एक टुमदार घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. हिरवाई असलेल्या शेतात वाहणारा गार वारा, शांत वातावरण आणि प्रदूषणमुक्त जीवनशैली यामुळे अनेकांना आपल्या शेतजमिनीवर घर बांधण्याची इच्छा असते. मात्र, केवळ इच्छा असून चालत नाही. कायदेशीर नियम पाळूनच तुम्हाला तुमच्या शेतजमिनीवर घर बांधता येते. कोणतीही शेतजमीन ही शेतीसाठी राखीव असते, त्यामुळे थेट शेतजमिनीवर घर बांधणे कायदेशीर दृष्ट्या बघितले तर योग्य नाही.

Advertisement

यामध्ये कायदेशीर दुरुस्त जर पाहिले तर जर तुम्ही बिगरशेती (NA – Non-Agricultural) परवानगी घेतली नाही, तर स्थानिक प्रशासन (ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा जिल्हा प्रशासन) अशा अनधिकृत बांधकामावर कारवाई करू शकते आणि ते पाडले जाऊ शकते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि कायदेशीर गुंत्यात अडकू नये म्हणून सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Advertisement

शेतात घर बांधण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया

Advertisement

शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी सर्वप्रथम त्या जमिनीचे बिगरशेती (NA) रूपांतर करणे बंधनकारक आहे. यासाठी स्थानिक नगर परिषद, ग्रामपंचायत किंवा महसूल विभागाकडून अधिकृत परवानगी घेणे गरजेचे आहे. NA परवानगी मिळाल्यानंतरच बांधकाम सुरू करता येते.

Advertisement

बिगरशेती (NA) परवानगी मिळवण्यासाठी प्रक्रिया

Advertisement

बिगरशेती परवानगी मिळवण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. तहसील कार्यालयाकडून जमिनीची तपासणी केली जाते आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी NA प्रमाणपत्र जारी करतात.

बांधकाम परवानगी

NA प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, बांधकाम आराखडा तयार करून स्थानिक प्रशासनाकडून (ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका) बांधकाम परवानगी (Building Permission) घ्यावी लागते.

विकास परवानगी कशी घ्यावी?

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत विकास परवानगी घेणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने ‘Building Plan Management System’ (BPMS) लागू केले आहे, ज्याद्वारे बिगर कृषी वापर प्रमाणपत्रे आणि विकास परवानगी अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने दिली जातात.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतजमिनीवर बिगरशेती परवानगी आणि बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी खालील महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत:

जमीन मालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी),सातबारा उतारा (7/12) आणि फेरफार उतारा

पिकांची व जमीन वापराची नोंद

जमीन महसूल पावत्या (मालकी आणि कर भरणा प्रमाणपत्र),सर्वेक्षण नकाशा आणि जमिनीचा लेआउट प्लॅन,कोणत्याही थकबाकी किंवा कायदेशीर वाद नसल्याचा दाखला

जर वरील सर्व अटी पूर्ण झाल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून NA प्रमाणपत्र मिळाले, तर त्या जमिनीवर कायदेशीर बांधकाम करता येते.

नवीन शासन निर्णय

महाराष्ट्र सरकारने 23 मे 2023 रोजी नवीन शासन निर्णय (GR) काढला आहे, ज्यामध्ये ‘बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम’ लागू करण्यात आली आहे. यानुसार बिगर कृषी वापर प्रमाणपत्रे आणि विकास परवानगी अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने दिली जाणार आहे.

नवीन नियमांनुसार काही महत्त्वाच्या अटी

शेतजमिनीचा वापर बिगरशेती उद्देशांसाठी (जसे की घर बांधणे) करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे त्या जमिनीचा संपूर्ण ताबा असावा.

संबंधित जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी आरक्षित नसावी.औद्योगिक किंवा टाऊनशिप प्रकल्पांसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत आवश्यक नियमांचे पालन करावे लागेल.बांधकाम करताना स्थानिक नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या नियमानुसार FSI (Floor Space Index) आणि इतर नियमांचे पालन करावे लागेल.

शेतात घर बांधताना घ्यावयाची काळजी

शेतात घर बांधताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्या

बिगरशेती परवानगी आणि बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम सुरू करू नका. अन्यथा प्रशासन बांधकाम अनधिकृत मानू शकते आणि ते हटवण्याची नोटीस मिळू शकते.

जमिनीच्या कायदेशीर स्थितीची खात्री करा

जमीन खरेदी करताना किंवा बांधकाम करण्यापूर्वी तिला कोणत्याही प्रकारचे कायदेशीर वाद किंवा थकबाकी नाही याची खातरजमा करावी.

बांधकाम आराखड्याची मंजुरी घ्या

अधिकृत आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियरकडून घराचा प्लॅन तयार करून तो संबंधित विभागाकडून मंजूर करून घ्या.

ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नियम पाळा

कोणत्याही बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होऊ शकतो आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते.

शेतात घर बांधण्याआधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक

शेतात घर बांधण्याचे स्वप्न अनेकांचे असते, मात्र त्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर प्रक्रियांची माहिती नसल्यामुळे अनेक जण अडचणीत सापडतात. परवानगीशिवाय कोणतेही घर किंवा इतर बांधकाम केल्यास प्रशासन ती अनधिकृत घोषित करू शकते आणि ती तोडण्याचे आदेश देऊ शकते. त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:

NA (बिगरशेती) परवानगी घ्या

बांधकाम परवानगी मिळवूनच काम सुरू करा.सातबारा उतारा, फेरफार उतारा आणि सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण ठेवा.
स्थानिक प्रशासनाचे सर्व नियम पाळा.
जर तुम्ही वरील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून योग्य परवानग्या घेतल्या, तर कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या शेतात टुमदार घराचे स्वप्न साकार करता येईल.