ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पुढील हंगामापासून ऊस पिक कर्जदरात हेक्टरी होणार ‘इतकी’ वाढ
Sugarcane Loan Rate:- शेतीच्या बाबतीत बघितले तर पीक कर्ज हे अतिशय महत्त्वाचे असून शेतीच्या बाबतीतले अनेक महत्त्वपूर्ण कामे करण्याच्या दृष्टिकोनातून पीक कर्जाची भूमिका शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरते.
पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगाने बघितले तर या ठिकाणी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर होते व नक्कीच या शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज हे खूप महत्त्वाचे आहे.पिक कर्ज प्रामुख्याने जिल्हा बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिले जाते.
अगदी याप्रमाणे जर आपण ऊस पिक कर्ज दराच्या बाबतीत बघितले तर यामध्ये जुलै नंतर हंगाम 2025- 26 मध्ये ऊस पिक कर्जदरात वाढ होणार आहे व हेक्टरी पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय पीक कर्ज कमिटीने घेतला असून तसा प्रस्ताव देखील शासनाला सादर केला जाणार आहे.
प्रस्तावात करण्यात आल्या आहेत या मागण्या
हंगाम 2025-26 मध्ये ऊस पिक कर्ज दरात हेक्टरी पाच टक्के वाढीचा निर्णय जिल्हास्तरीय पीक कर्ज कमिटीने निश्चित केला असून तसा प्रस्ताव शासनाला आता सादर केला जाणार आहे. या प्रस्तावानुसार आता खोडव्यासाठी हेक्टरी 5750 तर अडसाली उसाकरिता हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
यामध्ये खोडवा पिकासाठी सरासरी सव्वा लाख रुपये पीक कर्ज मिळावे अशी देखील मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या सगळ्या संदर्भात नाबार्डच्या माध्यमातून पुढील हंगामामध्ये पिक कर्जाकरिता खेळते भांडवली कर्जदाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली व यामध्ये जिल्हास्तरीय पीक कर्ज कमिटीने पाच टक्के कर्ज दरात वाढ सुचवली असून हा निर्णय राज्यपातळीवर होईल व नंतर नाबार्ड मध्ये होणार आहे.
याबाबत माहिती देताना कोल्हापूर जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे यांनी म्हटले की प्रति हेक्टरी पाच टक्के वाढीव कर्जदर ऊस पिकासाठी सुचवला आहे व हा दर शिफारस करून प्रस्ताव देखील राज्याला पाठवण्यात आला असून सरकारकडून पुढील आदेश जेव्हा येईल तेव्हा अंमलबजावणी केली जाणार आहे.