For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

90 दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न ! गोंदियाच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी मोहरीच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती, कस केलं नियोजन ?

02:10 PM Jan 01, 2025 IST | Krushi Marathi
90 दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न   गोंदियाच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी मोहरीच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती  कस केलं नियोजन
Gondia Successful Farmer
Advertisement

Gondia Successful Farmer : विदर्भातील बहुतांशी शेतकरी धान अर्थातच भात पिकाची लागवड करतात. या पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. मात्र धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि यामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये भूजल पातळी कमी झाली आहे. दुसरीकडे धान पिक उत्पादित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च करावा लागत असून मजुरीवर देखील शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागतोय.

Advertisement

यामुळे आता विदर्भातील अनेक शेतकरी इतर पर्यायी पिकांच्या शोधात असल्याचे दिसत. याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील फनेंद्र हरिणखेडे या प्रयोगशील शेतकऱ्याने धान ऐवजी मोहरीची लागवड केली. महत्त्वाचे म्हणजे या पिकाची लागवड हरिणखेडे यांच्यासाठी फायद्याची ठरली असून यातून त्यांना 90 दिवसात दोन लाखांची कमाई सुद्धा झाली आहे.

Advertisement

यामुळे हरीणखेडे यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार असून आगामी काळात विदर्भात मोहरीचे क्षेत्र वाढेल असा विश्वास व्यक्त होतोय. हरीणखेडे यांच्याकडे एकूण 14 एकर जमीन आहे मात्र यातील त्यांनी पाच एकर जमिनीवर मोहरीची लागवड केली. या पिकातून त्यांना अवघ्या तीन महिन्यांच्या काळात दोन लाखांचे उत्पन्न मिळाले.

Advertisement

गोरेगाव शहरालगत असलेल्या ग्राम कटंगी या ठिकाणी हरीणखेडे यांची शेती आहे. ते सेवानिवृत्त लेखाधिकारी आहेत. ते पंचक्रोशीतील एक प्रगतिशील शेतकरी आहेत. फनेंद्र हरिणखेडे नेहमीच आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. यावेळी त्यांनी आपल्या शेतात मोहरी पिकाची लागवड केली असून तब्बल पाच एकरात हे पीक पेरले आहे.

Advertisement

या पिकातून त्यांनी ९० दिवसांत दोन लाखांचा नफा मिळवून घेतला. हरीणखेडे यांच्या शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. शेतीच्या देखरेखीसाठी त्यांनी आठ सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले आहेत. त्यातून ते आपल्या शेतीवर 24 तास नजर ठेवतात. त्यांच्या शेतात सागवान, लिंबू, चिकू, आंबा, फणस, आवळा व नारळची झाडे आहेत. हरिणखेडे यांनी आपल्या शेतात मोहगुणीची २०० झाले लावली आहेत.

Advertisement

शिवाय ते आता मोहरीची देखील शेती करू लागले आहेत. यामुळे त्यांना शेतीमधून चांगली कमाई होत असून त्यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्याची समस्या मोठ्या प्रमाणात डोकं वर काढत असताना हरीणखेडे यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी नक्कीच वाखाण्याजोगी आहे.

Tags :