For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

काय सांगता ! 'या' जातीच्या माशाला तब्बल 1600 ते 1800 रुपये प्रति किलोचा दर मिळतो, मासळीची कोणती जात आहे एवढी महाग ?

06:39 PM Nov 14, 2024 IST | Krushi Marathi
काय सांगता    या  जातीच्या माशाला तब्बल 1600 ते 1800 रुपये प्रति किलोचा दर मिळतो  मासळीची कोणती जात आहे एवढी महाग
Fish Farming
Advertisement

Fish Farming : मांसाहार म्हटलं की माशांचा विषय येतोच. मासे खाणे अनेकांना आवडते. वेगवेगळ्या जातीचे मासे बाजारात उपलब्ध असतात. खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मासे बाजारात उपलब्ध होतात. माशांच्या जातीनुसार त्यांचे भाव ठरवले जातात. मात्र आज आपण माशाची अशी एक जात जाणून घेणार आहोत ज्याला किलोला तब्बल 1600 ते 1800 रुपये एवढा भाव मिळतो.

Advertisement

आम्ही ज्या जातीबाबत बोलत आहोत तो आहे शेवंड अर्थातच लॉबस्टर मासा. या जातीला चांगला विक्रमी दर मिळतो कारण की आखाती देशांमध्ये या जातीच्या माशाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.

Advertisement

या जातीला विक्रमी भाव मिळत असल्याने ही मासळी स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना चांगला फायदा देणारी ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून याची आवक फारच कमी प्रमाणात होत आहे. ही जात आता अल्प प्रमाणात सापडत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले आहे.

Advertisement

बाजारातील जाणकार लोकांनी, आखाती देशात मागणीमध्ये असणाऱ्या ही मासळी आता उपलब्ध होत नाहीये. या जातीचा मासा दिवसाला चारशे ते पाचशे किलोपर्यंत विक्री होते. मात्र सध्या बाजारात ती मिळत नाहीये.

Advertisement

खरेतर, हा मासा संपूर्ण जगात आढळतो. जगभरातील सर्वच समुद्रांत शेवंड मासे आढळतात. खडकाळ, वाळूमय किंवा गढूळ पाण्यात तसेच खोल समुद्रातही शेवंड सापडते, अशी माहिती या व्यवसायातील जाणकार लोकांनी दिली.

Advertisement

या जातींचे तीनशे ते पंधराशे ग्रॅम वजनाचे मासे 1600 ते 1800 रुपये प्रति किलो या दराने आणि 100 ते 250 ग्रॅम वजनाचे मासे अकराशे ते बाराशे रुपये प्रति किलो या दराने घाऊक बाजारात विकले जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली.

या जातीच्या माशाची चव आणि कमी उपलब्धता तसेच यामध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता याला ग्राहकांमध्ये मागणी असल्याचे समजते.

Tags :