For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

दुष्काळी पट्ट्यात फुलवली ड्रॅगन फ्रुटची बाग, नाशिकच्या महिला शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी होतेय लाखोंची कमाई

03:57 PM Oct 28, 2024 IST | Krushi Marathi
दुष्काळी पट्ट्यात फुलवली ड्रॅगन फ्रुटची बाग  नाशिकच्या महिला शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी  वर्षाकाठी होतेय लाखोंची कमाई
Farmer Success Story
Advertisement

Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय हा किती रिस्की आहे हे वेगळं सांगायला नको. मातीत पेरलेलं उगवेलचं याची शाश्वती कोणालाच नाही. शिवाय उत्पादित झालेल्या मालाला काय दर मिळणार हे देखील शेतकऱ्यांच्या हातात नाही. यामुळे अनेकदा निसर्गाशी दोन हात करून जर शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवले तर बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते.

Advertisement

मात्र अशा या प्रतिकूल परिस्थितीतही अनेक शेतकरी बांधव आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून इतरांना दिशा दाखवण्याचे काम करतात. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यातून असेच एक उदाहरण समोर येत आहे.

Advertisement

येवला तालुक्यातील एरंडगाव खुर्द येथील मंगलाताई साठे यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीतून आर्थिक उन्नती साधली आहे. ते ड्रॅगन फ्रुट लागवडीतून लाखो रुपयांची कमाई मिळवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ड्रॅगन फ्रुट च्या शेतीतच आंतरपीक म्हणून सागाची सुद्धा लागवड केली आहे.

Advertisement

येवला तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यासोबतच डाळिंब आणि द्राक्ष पिकांच्या फळबागा देखील तालुक्यात नजरेस पडतात. मात्र या पारंपारिक पिकांसोबतच काही शेतकरी बांधव नवनवीन प्रयोगही करत आहेत.

Advertisement

मंगलाताई साठे या प्रयोगशील महिला शेतकऱ्याने पती बाबासाहेब साठे व कुटुंबाच्या मदतीने त्यांनी तीन एकर जमिनीपैकी एक एकर जमिनीवर ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली. ड्रॅगन फ्रुट बाबत त्यांना सर्वप्रथम युट्युब वरून माहिती मिळाली.

Advertisement

यानंतर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली आणि त्यामध्ये सागाची आंतरपीक म्हणून लागवड केली. जम्बो रेड जातीची 2250 ड्रॅगन फ्रुट ची रोपे त्यांनी 2021 मध्ये लावलीत. यामध्ये त्यांनी 550 झाडे सागाची लावलेली आहेत.

ड्रॅगन फ्रुट च्या लागवडीसाठी त्यांना साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला आणि पहिल्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये या पिकातून त्यांना दीड लाखांचे उत्पन्न मिळाले 2023 मध्ये त्यांना एक लाख 80 हजाराचे उत्पन्न मिळाले. यावर्षी अर्थातच 2024 मध्ये त्यांना दोन लाख 80 हजाराचे उत्पन्न मिळाले.

विशेष म्हणजे त्यांना भविष्यात सागाच्या झाडापासूनही कमाई होणार आहे आणि ते ड्रॅगन फ्रुट ची रोपे तयार करूनही त्याची विक्री करणार आहेत. एकंदरीत शेतीमध्ये जर काळाच्या ओघात बदल केला गेला तर नक्कीच लाख रुपयांची कमाई करता येऊ शकते हेच साठे यांच्या या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Tags :