For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी, ऐन दिवाळीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढल्यात ! 15 किलोचा डब्बा आता कितीला ?

06:43 PM Oct 29, 2024 IST | Krushi Marathi
सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी  ऐन दिवाळीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढल्यात   15 किलोचा डब्बा आता कितीला
Edible Oil Rate
Advertisement

Edible Oil Rate : सध्या संपूर्ण देशभर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे खाद्यतेलाच्या आहे. सर्वत्र दीपोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. आपल्या राज्यातही दीपोत्सवाच्या अनुषंगाने आनंदाचे वातावरण आहे. पण, याच दिपोत्सवाच्या आनंददायी आणि उत्साही वातावरणात सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढतेय.

Advertisement

कारण की खाद्य तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा बेजार झाली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या सणाला फराळ बनवला जातो.

Advertisement

दिवाळी फराळ म्हटलं की याला बनविण्यासाठी सर्वात जास्त तेलाचा वापर केला जातो. आता खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांना फराळ बनवणे चांगलेचं महाग होणार आहे.

Advertisement

खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असून यामुळे सर्वसामान्य जनता सरकार विरोधात नाराज आहे. दरम्यान आता आपण खाद्यतेलाच्या नवीन किमती कशा आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

खाद्यतेलाचे ताजे दर

Advertisement

खाद्यतेलाचे भाव हे किलोमागे तब्बल 25 ते 30 रुपयांनी वाढलेत. केंद्रातील सरकारने कच्चे आणि रिफाइंड खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे. याचाच परिणाम हा खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे.

कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 35.75 टक्के वाढवले गेले आहे. यामुळे खाद्यतेलाचे दर हे किलोमागे 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत.

राइस ब्रान आणि सोयाबीन तेलाचा किरकोळ दर आतापर्यंत 110 रुपये होता, तो आता 125 रुपयांच्या घरात गेलाय. सूर्यफूल तेल हे 125 रुपये प्रति किलो या दराने विकले जात होते ते आता 140 ते 145 रुपयावर पोहचले आहे.

तसेच शेंगदाणा तेलाचे भावही 30 रुपयांपर्यंत वाढले आहे. आधी शेंगदाणा तेल हे 160 ते 170 रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते मात्र आता शेंगदाणा तेल 190 रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहे. 15 किलोच्या तेल डब्ब्याची किंमत देखील दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढली आहे.

सूर्यफूल तेलाच्या डब्याचा जुना दर 1750 रुपये होता तर आताचे दर 2140 रुपये आहे. तसेच सोयाबीन डब्याचा जुना दर 1600 रुपये व आताचे दर 2050 रुपये आहे. पामतेल जुना दर 1600 तर आताचे 1850 रुपये दर आहेत.

Tags :