For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडकोच्या घरांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार, वाचा डिटेल्स

08:48 PM Dec 11, 2024 IST | Krushi Marathi
नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी   सिडकोच्या घरांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार  वाचा डिटेल्स
Cidco Lottery News
Advertisement

Cidco Lottery News : मुंबई, नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता या शहरांमध्ये घर खरेदीसाठी म्हाडा आणि सिडको कडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असते. दरम्यान सिडको प्राधिकरणाने नवी मुंबई मधील तब्बल 26000 घरांसाठी नुकतीच लॉटरी जाहीर केली आहे.

Advertisement

याच लॉटरी प्रक्रिया संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या लॉटरीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सिडको प्राधिकरणाने वाढवण्याचा एक मोठा निर्णय आज घेतला असून यामुळे हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे आणि आतापर्यंत ज्यांनी अर्ज केलेला नसेल त्यांनाही अर्ज सादर करता येणार आहे.

Advertisement

सिडको तर्फे 12 ऑक्टोबरला अर्थातच विजयादशमीच्या मुहूर्तावर नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली. सिडको प्राधिकरणाने तब्बल 26000 घरांसाठी लॉटरी जाहीर केली.

Advertisement

नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमधील या घरांसाठी सिडको प्राधिकरणाने अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू केली.

Advertisement

दरम्यान याच घरांसाठी आता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांना आता 26 डिसेंबर 2024 पर्यंत या घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. Cidco प्राधिकरणाने आज याबाबतचा निर्णय घेतला असून प्राधिकरणाच्या या निर्णयाचे नागरिकांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

Advertisement

प्राधिकरणाच्या या निर्णयाचा नागरिकांना तर फायदा होणारच आहे शिवाय अर्ज करणाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. आतापर्यंत या लॉटरीसाठी एक लाख लोकांनी अर्ज केले असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

मात्र या घरांसाठी अजूनही अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असल्याने प्रत्यक्षात अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या देखील आगामी काळात वाढणार आहे.

तथापि ज्या नागरिकांना या घरांसाठी अर्ज करायचा असेल मात्र अजून अर्ज करता आला नसेल त्यांनी 26 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन यावेळी जाणकार लोकांनी केले आहे.

Tags :