For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी ! सिडकोची 'या' भागातील हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर

09:08 PM Oct 12, 2024 IST | Krushi Marathi
घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी   सिडकोची  या  भागातील हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर
Cidco Homes
Advertisement

Cidco Homes : नोकरी लागली की सर्वप्रथम डोळ्यापुढे स्वतःच्या हक्काच्या घराचे चित्र फिरू लागते. नोकरीनंतर सर्वजण स्वतःच्या घरासाठी झगडत असतात. दरम्यान जर तुम्ही ही नवी मुंबई परिसरात स्वतःचे हक्काचे घर घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

Advertisement

ती म्हणजे सिडको प्राधिकरणाने हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. सिडको प्राधिकरण दरवर्षी सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरातील घरांची उपलब्धता करून देत असते. दरवर्षी सिडको प्राधिकरण हजारो घरांसाठी लॉटरी काढत असते.

Advertisement

यंदाही सिडको प्राधिकरणाने हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. आज विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडको प्राधिकरणाने 26000 घरांची योजना अमलात आणली आहे. खरेतर गेल्या अनेक दिवसांपासून या लॉटरीची वाट पाहिली जात होती.

Advertisement

सिडकोची ही लॉटरी नेमकी कधी निघणार असा सवाल उपस्थित होत होता. अखेर कार प्राधिकरणाने आज या लॉटरीची घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिडको ने जाहीर केलेल्या या लॉटरीमध्ये नवी मुंबई परिसरातील तळोजा, खारघर, खारकोपर, कळंबोली, पनवेल, मानसरोवर, खांदेश्वर आणि वाशी या ठिकाणची घरे उपलब्ध करून दिली आहेत.

Advertisement

सिडको प्राधिकरणाची ही लॉटरी एकूण तीन टप्प्यात निघणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्ज नोंदणी प्रक्रिया आणि कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात घरांसाठीची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

Advertisement

यानंतर मग या लॉटरीचा तिसरा टप्पा राहणार म्हणजेच लॉटरीची सोडत निघणार आहे. सिडको ने जाहीर केलेल्या या लॉटरीत दुर्बल घटकांसाठी म्हणजेच अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी १३ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १३ हजार घरे आहेत.

यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास पन्नास टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर, तसेच खारकोपर, बामणडोंगरी गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचा या गृहनिर्माण सोडतीत समावेश आहे. नक्कीच सिडकोच्या या लॉटरीमुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Tags :