EMI बाउन्स झाला तरी घाबरू नका! सिबिल स्कोर वाचवण्यासाठी तज्ञांच्या ‘या’ 4 सल्यांचा वापर करा… नाही घसरणार CIBIL
CIBIL Score:- गेल्या काही वर्षांपासून महागाई झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे लोकांना मोठ्या आर्थिक गरजांसाठी कर्ज घ्यावे लागते. घर किंवा गाडी खरेदी करायची असेल, तर बहुतेक जण बँकेकडून कर्ज घेतात आणि त्याचा EMI नियमितपणे भरतात. मात्र, काही वेळा आर्थिक अडचणी येतात आणि कर्जाचा हप्ता वेळेवर भरणे कठीण होते. जर तुम्ही हप्ता वेळेवर भरला नाही, तर बँक तुमचा CIBIL स्कोअर कमी करते आणि पुढे कर्ज घेण्यास अडथळा निर्माण होतो. याशिवाय, बँक विलंब शुल्क किंवा अतिरिक्त दंड आकारू शकते.
ईएमआय भरला नाही तरी सिबिल स्कोर वाचवण्याचे उपाय
अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही काही महत्त्वाचे उपाय करून तुमचा CIBIL स्कोअर वाचवू शकता आणि आर्थिक नुकसान टाळू शकता. सर्वात आधी, बँक व्यवस्थापकाशी चर्चा करा. जर तुमचा हप्ता उशिरा भरला गेला असेल किंवा काही महिन्यांसाठी भरू शकत नसाल, तर बँकेच्या व्यवस्थापकाशी थेट संवाद साधा. त्यांना तुमची आर्थिक परिस्थिती स्पष्टपणे समजावून सांगा आणि भविष्यात हप्ता वेळेवर भरण्यासाठी योजना कशी आहे हे स्पष्ट करा. काही वेळा, बँक लवचिक धोरण स्वीकारून तुम्हाला काही सवलती देऊ शकते.
जर तुम्ही 3 महिन्यांपर्यंत EMI भरू शकत नसाल, तर बँक तुमच्या CIBIL स्कोअरमध्ये नकारात्मक नोंद करू शकते. त्यामुळे, पहिल्याच महिन्यात उशीर झाला तरी लगेच व्यवस्थापकाशी संपर्क साधा. कधी कधी बँक व्यवस्थापक तुमचा विलंब लक्षात घेतात आणि जर तो किरकोळ असेल तर CIBIL रिपोर्टमध्ये त्याचा मोठा परिणाम होणार नाही याची काळजी घेतात.
याशिवाय, हप्ता होल्डवर ठेवण्याचा पर्याय बँक तुम्हाला देऊ शकते. यासाठी, तुम्ही थेट बँकेशी संपर्क साधून काही काळ हप्ता रोखण्याची विनंती करू शकता. जर तुमची परिस्थिती गंभीर असेल, तर बँक काही काळासाठी EMI स्थगित करण्याचा पर्याय देऊ शकते. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर खराब होणार नाही आणि तुम्हाला थोडा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
जर तुम्हाला EMI भरायला उशीर होत असेल, तर थकीत EMI (Arrear EMI) चा पर्याय निवडता येतो. बऱ्याच कर्जांमध्ये EMI चा भरण्याचा पर्याय महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच अॅडव्हान्स EMI स्वरूपात असतो. मात्र, काही कर्ज प्रकारांमध्ये तुम्हाला महिन्याच्या शेवटी EMI भरण्याची मुभा मिळू शकते. जर तुम्हाला काही काळासाठी पैसे उभे करता येणार असेल तर हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या कर्जाच्या परतफेडीवर नियंत्रण ठेवा आणि शक्य तितक्या लवकर हप्ते नियमित करा. जेव्हा परिस्थिती सुधारेल, तेव्हा विलंबित EMI भरा आणि तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी योग्य नियोजन करा. या उपायांमुळे तुम्ही CIBIL स्कोअर चांगला ठेवू शकता आणि भविष्यात कर्ज घेण्यासाठी पात्र राहू शकता.