For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

पुणेकरांच्या भेटीला लवकरच येणार आणखी एक मेट्रो मार्ग! केंद्र सरकारने दिला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या माहिती

03:53 PM Jan 21, 2025 IST | Sonali Pachange
पुणेकरांच्या भेटीला लवकरच येणार आणखी एक मेट्रो मार्ग  केंद्र सरकारने दिला ग्रीन सिग्नल  जाणून घ्या माहिती
pune metro
Advertisement

Pune Metro News:- पुणे हे महाराष्ट्रातील खूपच महत्त्वाचे आणि वेगाने विकसित झालेले आणि प्रसिद्ध आयटी हब म्हणून देखील पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यामध्ये जर आपण बघितले तर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या अनेक भागांमध्ये आपल्याला दिसून येते व हीच वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पुणे शहरात अनेक प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत व या प्रकल्पांमध्ये मेट्रो प्रकल्प अतिशय महत्त्वाचे आहेत.

Advertisement

सध्या पुण्यामध्ये काही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे व याचा नक्कीच फायदा पुणेकरांना खूप मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येत आहे. या अनुषंगाने आता परत पुणेकरांच्या पारड्यामध्ये आणखी एका मेट्रो मार्गाची भर पडणार असून लवकरच याबाबतची गुड न्यूज पुणेकरांना मिळेल अशी एक शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

‘या’ दरम्यान बांधला जाणार भूमिगत मेट्रो मार्ग?
मिळालेल्या माहितीनुसार जर बघितले तर स्वारगेट मेट्रो स्टेशन येथून कात्रज पर्यंतच्या साडेपाच किलोमीटर अंतरासाठी भूमिगत मेट्रो मार्ग बांधायला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला असून या साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरील मेट्रो मार्गावर मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज या तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन देखील प्रस्तावित आहे.

Advertisement

केंद्र सरकारकडून आता या भूमिगत मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल मिळाला असून त्यामुळे यासाठीच्या आवश्यक निविदा प्रक्रिया सुरू होऊन त्यानंतर वर्क ऑर्डर काढण्यात येणार आहे. अगोदरच या भूमिगत मेट्रो मार्गावर तीन स्टेशन प्रस्तावित आहेत.

Advertisement

परंतु तीन ऐवजी या मार्गावर पाच मेट्रो स्टेशन उभारण्यात यावीत अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून केली जात आहे व त्यामध्ये बालाजी नगर, सहकार नगर व बिबडेवाडी मेट्रो स्टेशनच्या यामध्ये समावेश करण्याची मागणी आहे. त्यामुळे यामध्ये किती व्यवहार्यता आहे हे तपासण्याच्या सूचना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केल्या आहेत.

Advertisement

काय म्हणाल्या माधुरी मिसाळ?
नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रो कार्यालयामध्ये मेट्रोच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला व त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचे प्राधान्य असून पुणे मेट्रो हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे व त्याचे काम वेगाने पूर्ण होऊन वाहतूक कोंडी दूर व्हावी याकरिता सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले.

इतकेच नाही तर राज्यमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्ट मॅपिंगचा विषय हाती घेतला असून त्यातून मेट्रो तसेच बस, रेल्वे, रिक्षा कोणत्या ठिकाणी आहे याची एकत्रित माहिती प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे व त्याबाबत एकत्रित मॅप तयार करण्यासाठी विविध यंत्रणांशी समन्वय साधला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

पुण्यातील महत्त्वाच्या या दोन मेट्रो मार्गांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे
पुणे शहरातील रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या दोन मेट्रोमार्गिकांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे व कॅबिनेट बैठकीत याला लवकरच अंतिम मान्यता मिळेल

व याशिवाय खडकवासला ते खराडी आणि माणिक बाग- वारजे- एसएनडीटी असे दोन मेट्रो मार्गांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले असून ते तज्ञ कमिटीसमोर जाऊन त्याबाबत पुढील निर्णय होईल असे देखील माधुरी मिसाळ यांनी म्हटले आहे.

स्वारगेट मेट्रो रेल्वे स्टेशन जोडण्यात येईल स्वारगेट एसटी स्थानकास?
तसेच माधुरी मिसाळ यांनी महत्त्वाची माहिती देताना पुढे म्हटले की, स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट तयार करण्यात येणार असून ते स्वारगेट एसटी स्थानकास जोडण्यासंबंधीचा प्रस्ताव पुणे मेट्रोने एमएसआरडीसीला द्यावा व त्यानुसार सदर मेट्रो स्टेशन व बस स्टॅन्ड एकमेकांना जोडल्यास प्रवाशांना देखील त्याचा फायदा होईल. पुढील आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक होणार आहे व त्यामध्ये विविध बाबींवर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असे देखील मंत्री मिसाळ यांनी म्हटले.