For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Car Launch In March: मार्चमध्ये कार लव्हर्ससाठी महासंधी! ‘या’ 6 कार्स बदलून टाकतील भारतीय बाजार.. तुम्ही कोणती घ्याल?

09:08 AM Mar 01, 2025 IST | Krushi Marathi
car launch in march  मार्चमध्ये कार लव्हर्ससाठी महासंधी  ‘या’ 6 कार्स बदलून टाकतील भारतीय बाजार   तुम्ही कोणती घ्याल
car launch in march
Advertisement

Car Launch In March:- मार्च 2025 हा महिना कारप्रेमींसाठी विशेष ठरणार आहे, कारण यंदा अनेक जबरदस्त इलेक्ट्रिक आणि लक्झरी कार भारतीय बाजारात दाखल होत आहेत. यात मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ई-विटारापासून ते लक्झरी Mercedes Maybach SL 680 आणि स्पोर्टी MG Cyberster पर्यंतच्या दमदार गाड्या समाविष्ट आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर या सहा जबरदस्त कार्सबाबत A टू Z माहिती जाणून घ्या.

Advertisement

मार्च 2025 मध्ये लॉन्च होणाऱ्या कार

Advertisement

Volvo XC90 फेसलिफ्ट – लक्झरी SUV मध्ये नवे अपडेट्स

Advertisement

स्वीडिश ब्रँड Volvo 4 मार्च रोजी त्यांची XC90 लक्झरी SUV फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये सादर करणार आहे. या कारमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील, जे तिला अधिक प्रीमियम लुक आणि परफॉर्मन्स देतील. नव्या मॉडेलमध्ये आकर्षक ग्रिल, एलईडी DRLs, अपडेटेड बंपर आणि स्टायलिश अलॉय व्हील्स असतील. तसेच, इंटेरियरमध्ये 11.2-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये 2.0-लिटर पेट्रोल इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह मिळेल. ही लक्झरी SUV थेट Mercedes-Benz GLE, BMW X5 आणि Audi Q7 ला टक्कर देईल.

Advertisement

मारुती ई-विटारा – मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV

Advertisement

मारुती सुझुकी लवकरच त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV, ई-विटाराची किंमत आणि बुकिंग तपशील जाहीर करणार आहे. जानेवारी 2025 मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. ही कार 500 किमीच्या दमदार रेंजसह येईल आणि 49 kWh व 61 kWh अशा दोन बॅटरी पॅक पर्यायात उपलब्ध असेल. याचे पॉवर आउटपुट 142 bhp ते 172 bhp पर्यंत असेल. शिवाय, ही ADAS (Advanced Driver Assistance System) टेक्नोलॉजीसह येणारी मारुतीची पहिली कार असेल. Hyundai Creta EV हिला थेट स्पर्धा देणार आहे.

किआ EV6 फेसलिफ्ट – अपडेटेड इलेक्ट्रिक SUV

किआ आपल्या लोकप्रिय EV6 इलेक्ट्रिक SUV चे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय बाजारात सादर करणार आहे. नवीन मॉडेलमध्ये आधुनिक LED लायटिंग, अपडेटेड डिझाईन आणि इंटिरियरमध्ये नवीन स्मार्ट कनेक्टेड फीचर्स मिळतील. ही कार इम्पोर्ट केली जाईल, त्यामुळे तिची किंमत थोडी अधिक असण्याची शक्यता आहे. दमदार रेंज आणि आकर्षक डिझाईनमुळे EV6 ही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये महत्त्वाची कार ठरेल.

MG Cyberster – इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार

MG Motor लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार Cyberster सादर करणार आहे. ही कार 510 bhp पॉवर आणि 725 Nm टॉर्क निर्माण करते, त्यामुळे केवळ 3.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडू शकते. यात 77 kWh क्षमतेची बॅटरी असून ती 570 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. ही कार विशेष सिलेक्ट प्रीमियम डीलरशिपमधून विकली जाणार आहे. स्पोर्टी आणि लक्झरी कार शोधत असलेल्या ग्राहकांसाठी ही एक परफेक्ट निवड ठरेल.

MG M9 EV – प्रीमियम इलेक्ट्रिक MPV

MG लवकरच त्यांच्या M9 इलेक्ट्रिक MPV ची किंमत जाहीर करणार आहे. ही तीन रो असलेली मोठी फॅमिली कार आहे. यात 90 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 500 किमीपर्यंतची रेंज देते. शिवाय, ही कार DC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल, त्यामुळे केवळ 30 मिनिटांत 30 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. मोठ्या कुटुंबांसाठी आणि प्रवासप्रेमींसाठी ही एक उत्तम पर्याय ठरेल.

Mercedes Maybach SL 680 – सुपर लक्झरी कार

Mercedes-Benz त्यांची नवीन Maybach SL 680 लक्झरी कार 17 मार्चपर्यंत भारतीय बाजारात आणणार आहे. ही मेबॅकची सर्वात स्पोर्टी आणि लक्झरी कारपैकी एक असेल. यात 4.0-लिटर बाय-टर्बो V8 इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 577 bhp पॉवर आणि 800 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऑल-व्हील-ड्राईव्ह (AWD) प्रणालीसह येते. तिचे इंटिरियर अत्यंत रॉयल आणि लक्झरीयस असेल.