For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Success Story: पाणी विकून 7 हजार कोटींचा ब्रँड! ‘ही’ आहे बिसलरीची..अविश्वसनीय कहाणी…आज आहे अवघ्या भारतावर राज्य

01:33 PM Feb 26, 2025 IST | Krushi Marathi
success story  पाणी विकून 7 हजार कोटींचा ब्रँड  ‘ही’ आहे बिसलरीची  अविश्वसनीय कहाणी…आज आहे अवघ्या भारतावर राज्य
ramesh chauhan
Advertisement

Bisleri Success Story:- पाणी हे जीवनासाठी आवश्यक असले तरी त्याचा व्यावसायिक उपयोग करण्याचा विचार फारसा कुणी केला नव्हता. मात्र १९६५ मध्ये पाण्याला खऱ्या अर्थाने बाजारपेठ मिळाली आणि बिसलेरी या ब्रॅण्डने भारतभर आपली ओळख निर्माण केली. कोणताही प्रवास असो, कार्यक्रम असो किंवा घरगुती वापर—बिसलेरी हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. या यशामागे रमेश चौहान यांची दूरदृष्टी आणि मेहनत आहे. ज्यामुळे त्यांनी ७,००० कोटींच्या साम्राज्यावर आपली मोहोर उमटवली.

Advertisement

रमेश चौहान – एका उद्योजकाची यशोगाथा

Advertisement

१९४० मध्ये मुंबईत जन्मलेले रमेश चौहान (RJC) हे Massachusetts Institute of Technology (MIT) मधून मेकॅनिकल इंजिनियरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये दोन पदव्या घेतलेले आहेत. त्यांनी वयाच्या २२व्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला आणि पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. १९६९ मध्ये ‘पार्ले एक्स्पोर्ट्स’ने इटलीतील एका उद्योजकाकडून ‘बिसलेरी’ हा ब्रॅण्ड विकत घेतला आणि भारतात मिनरल वॉटर विकायला सुरुवात केली. त्यावेळी लोकांना पाणी विकत घेणे आवश्यक वाटत नव्हते, मात्र चौहान यांनी लोकांच्या गरजा ओळखून हा उद्योग विकसित केला.

Advertisement

लोकप्रिय ब्रॅण्ड्सचा विस्तार आणि बिसलेरीचा प्रवास

Advertisement

बिसलेरीच्या यशानंतर रमेश चौहान येथेच थांबले नाहीत. त्यांनी थम्स अप, गोल्ड स्पॉट, सिट्रा, माझा आणि लिम्का यांसारखे लोकप्रिय शीतपेय ब्रॅण्ड्स लाँच केले. विशेष म्हणजे, १९९३ मध्ये कोका-कोलाने भारतात पुनरागमन केल्यावर चौहान यांनी थम्स अप, लिम्का आणि गोल्ड स्पॉट हे ब्रॅण्ड्स ६० कोटी रुपयांना विकले. मात्र, बिसलेरी हा ब्रॅण्ड त्यांनी स्वतःकडे ठेवला आणि त्याचा विस्तार करत राहिले.

Advertisement

नवे प्रयोग आणि पर्यावरणपूरक उपक्रम

बिसलेरीने केवळ मिनरल वॉटरच नव्हे, तर ग्राहकांसाठी नवनवीन उत्पादनं बाजारात आणली. २०१६ मध्ये ‘बिसलेरी पीओपी’ अंतर्गत स्पायसी, लिमोनाटा, फोनझो आणि पिना कोलाडा असे चार फिजी फ्लेवर्स सादर करण्यात आले. तसेच, पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेऊन त्यांनी १९९५ मध्ये भारतात पहिल्यांदाच पीईटी (Polyethylene Terephthalate) रिसायकलिंग सुरू केले. बिसलेरी दरवर्षी ६०० टन पीईटी कचरा गोळा करून रिसायकल करते. २०१५ मध्ये कंपनीने शाळकरी मुलांच्या मदतीने आठ तासांत १.१ मिलियन प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या नावे केला.

झैनाब चौहान – यशामागची स्त्रीशक्ती

रमेश चौहान यांच्या पत्नी झैनाब चौहान यांचा बिसलेरीच्या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. १९७० च्या दशकात त्या बिसलेरीच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होत्या आणि थम्स अप, लिम्का, गोल्ड स्पॉट यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या यशस्वी निर्मितीसाठी त्यांनी योगदान दिले. उद्योगात पुरुषांचे वर्चस्व असताना झैनाब यांनी फ्रँचायजी मॉडेल विकसित करून बिसलेरीला भारतभर पोहोचवले.

नव्या पिढीचा पुढाकार – जयंती चौहान

झैनाब आणि रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान आता बिसलेरीचे नेतृत्व करत आहे. फक्त २४ वर्षांची असताना तिने बिसलेरीच्या व्यवसायात नवनवीन बदल घडवले. ‘फोर्ब्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात.“स्पर्धेकडे स्पर्धा म्हणून पाहण्याऐवजी आम्हीच आमचे स्पर्धक आहोत.”

चार लाख रुपयांत घेतलेली कंपनी आज ७,००० कोटींची!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमेश चौहान यांनी केवळ चार लाख रुपयांत बिसलेरी खरेदी केली होती. त्यावेळी केवळ पाच स्टोअर्स होते, तर आज भारतभर १२२ हून अधिक ऑपरेशनल प्लांट्स, ५,००० ट्रक्स आणि ४,५०० पेक्षा जास्त डिस्ट्रीब्यूटर्स आहेत. लोक आजही पाण्याची बाटली खरेदी करताना सहज ‘एक बिसलेरी आण’ असं म्हणतात, यावरून बिसलेरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बिसलेरी – केवळ पाण्याचा ब्रॅण्ड नव्हे, तर विश्वासाचं प्रतीक

आजही बिसलेरी हा भारतीय बाजारपेठेतील आघाडीचा मिनरल वॉटर ब्रॅण्ड आहे. हा प्रवास केवळ एका व्यावसायिक यशोगाथेपुरता मर्यादित नाही, तर दूरदृष्टी, मेहनत आणि सातत्याने बदल करण्याची क्षमता यांचं उत्तम उदाहरण आहे. बिसलेरीने भारतीय बाजारात पाण्याला केवळ गरज म्हणून नव्हे, तर एका ब्रॅण्डमध्ये रूपांतरित केलं आणि विश्वासार्हता मिळवली.