कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

आता बर्थ सर्टिफिकेट काढा तेही 2 मिनिटात! अवघ्या 20 रुपयात घरबसल्या जन्म प्रमाणपत्र मिळणार, कशी आहे प्रोसेस?

02:24 PM Nov 03, 2024 IST | Krushi Marathi
Birth Certificate News

Birth Certificate News : बर्थ सर्टिफिकेट अर्थातच जन्म प्रमाणपत्र हा एक सर्वात महत्त्वाचा शासकीय पुरावा आहे. मुलाच्या जन्मानंतर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र काढावे लागते.

Advertisement

हे प्रमाणपत्र सर्वच शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये उपयोगी ठरते. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते.

Advertisement

जन्मानंतर, एखाद्याला कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हेच मागितले जाते, परंतु काही लोकांकडे ते नसते आणि त्यांना ते बनवण्याची योग्य प्रक्रिया देखील माहित नसते.

हा दस्तऐवज जन्मानंतर २१ दिवसांच्या आत बनवणे आवश्यक आहे. जन्मानंतर 21 दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्र तयार केले नाही तर भविष्यात समस्या निर्माण होतात. पण हे जन्म प्रमाणपत्र नेमके कसे काढायचे?

Advertisement

मुलाचा जन्म झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्रसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा? याचा संदर्भात माहिती जाणून घेण्याचा आजचा आपला हा प्रयत्न. आज आपण अवघ्या दोन मिनिटात आणि घरबसल्या जन्म प्रमाणपत्र कसे काढायचे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement

जन्म प्रमाणपत्र कसे काढायचे?
बाळाचा जन्म झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत बर्थ सर्टिफिकेट काढावे लागते. जर कोणत्याही कारणास्तव 21 दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्र काढले गेले नाही तर हे प्रमाणपत्र काढण्यासाठी महापालिका कार्यालय किंवा जिल्हा पंचायत कार्यालयात जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

सरकारी दवाखान्यात बाळाचा जन्म झाला तर दवाखान्यातच बर्थ सर्टिफिकेट मिळते. सरकारी दवाखान्यांना बर्थ सर्टिफिकेट देण्याचे अधिकार प्राप्त आहेत. खाजगी दवाखान्यांना मात्र बर्थ सर्टिफिकेट देण्याचे अधिकार नसतात. आता आपण बर्थ सर्टिफिकेट साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत.

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच CRSORGI.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन साइन अप करावे लागणार आहे. यासाठी युजर नेम म्हणजेच वापरकर्ता नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागतो. मग तुम्ही नवीन पेजवर याल. जिथे संबंधित लिंकवर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला नवीन पोर्टलवर पुन्हा एकदा साइन अप करावे लागेल. तुम्हाला नाव, आडनाव, लिंग आणि जन्मतारीख यासारखे तपशील भरून पुढे जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा पत्ता तपशील भरावा लागेल आणि पुढे करावे लागेल. यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि राष्ट्रीयत्व निवडा. पोचपावती बॉक्सवर खूण करा आणि “पुढील” वर क्लिक करा.

नंतर पडताळणीसाठी OTP प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा. यानंतर मोबाईल नंबर आणि कॅप्चा वापरून लॉगिन घ्या. वरच्या उजव्या कोपर्यात तीन ओळीवर क्लीक करा आणि जन्म पर्याय निवडा. त्यानंतर रिपोर्ट बर्थवर क्लिक करा. मग बर्थ प्लेस अर्थात जन्म ठिकाण भरा. भाषा निवडा. मग मुलाची जन्मतारीख आणि मेलची माहिती भरा.

नाव प्रविष्ट करा. मग पालकाची सर्व माहिती भरा. यानंतर वडिलांचे तपशील (नाव, आडनाव, आधार क्रमांक, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक) भरा आणि नंतर आईची माहिती भरा. नंतर पत्त्याचा तपशील भरायचा आहे. मग, जन्म ठिकाण निवडा जसे की हॉस्पिटल. राज्य आणि जिल्हा निवडा, त्यानंतर उपजिल्हा आणि गाव/शहर निवडा.

पुढे "नोंदणी युनिट” निवडा आणि हॉस्पिटल तपशील भरायचा आहे. हा अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावे लागतील. हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप, अतिरिक्त दस्तऐवज पुरावा (पालकांचे पॅन कार्ड), सरकारी अधिकाऱ्याचा आदेश अपलोड करावे लागतील.

दस्तऐवज अपलोड केल्यानंतर, पूर्वावलोकन करा अन अर्ज सबमिट करा. यासाठी तुम्हाला 20 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही अवघ्या दोन मिनिटात आणि वीस रुपये शुल्क भरून बर्थ सर्टिफिकेट साठी अर्ज करू शकता.

Tags :
Birth Certificate News
Next Article