कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

गॅस मिळणार, खत मिळणार आणि पैसेही मिळणार! गोकुळच्या नव्या Model ची जोरदार चर्चा.. शेतकऱ्यांसाठी पैसे कमावण्याची मोठी संधी

01:01 PM Feb 27, 2025 IST | Krushi Marathi
biogas

Biogas Slurry:- ‘गोकुळ’ दूध संघाने शेतकऱ्यांच्या बायोगॅस युनिटमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचा उपयोग करून सेंद्रिय खतनिर्मितीचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे हा प्रकल्प दोन वर्षांपासून कार्यरत असून, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत संघाने ‘मायक्रो न्यूट्रियंट’, ‘ग्रोमॅक्स’, ‘फॉस्फ-प्रो’ यांसारख्या सेंद्रिय खतांची तब्बल १६ लाख रुपयांची विक्री केली आहे.

Advertisement

बायोगॅस युनिट आणि स्लरी संकलन प्रक्रिया

Advertisement

‘गोकुळ’ने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दोन वर्षांत जवळपास ४ लाख लिटर स्लरी खरेदी केली आहे. एन.डी.डी.बी., सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन आणि ‘गोकुळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अनुदानावर बायोगॅस युनिट्स उपलब्ध करून दिली जात आहेत. या युनिटमधून महिन्याला साधारणपणे दीड सिलिंडर इतका गॅस तयार होतो. याशिवाय उपउत्पादन म्हणून स्लरीही तयार होते, जी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

स्लरी खरेदी आणि प्रक्रिया कशी केली जाते?

Advertisement

शेतकऱ्यांकडून स्लरी खरेदी करताना तिची गुणवत्ता तपासली जाते. स्लरीमधील ‘pH’ आणि कुजलेल्या शेणाचे प्रमाण यावर आधारित दर निश्चित केला जातो. गुणवत्तेनुसार २५ पैशांपासून २ रुपयांपर्यंत प्रती लिटर दर ठरवला जातो. स्लरी संकलनासाठी एन.डी.डी.बी.ने विशेष टँकर दिला असून, संकलित स्लरी गडमुडशिंगी येथील खत निर्मिती प्रकल्पात आणली जाते. येथे स्लरीचे पाणी कमी करून ती वाळवली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते.

Advertisement

सेंद्रिय खतनिर्मिती आणि विक्री

संघाने तयार केलेल्या सेंद्रिय खतांची विक्री पशुवैद्यकीय सेंटर आणि चिलिंग सेंटरमार्फत केली जाते. या खतांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पुढील टप्प्यात ही उत्पादने खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगी प्रक्रियेमुळे त्यात काही अडथळे येत आहेत. परवाना मिळताच खत विक्रीला अधिक गती मिळेल.

७००० बायोगॅस युनिट्स कार्यान्वित

शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरत असून, गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात ७००० बायोगॅस युनिट्स बसवण्यात आली आहेत. या युनिट्समुळे शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस मिळतो तसेच शेतीसाठी दर्जेदार सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी हा उपक्रम स्वीकारत आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न

‘गोकुळ’ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले की, संघ शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आधुनिक सुविधा पुरवत आहे. बायोगॅस युनिटच्या माध्यमातून स्लरी संकलन करून दर्जेदार सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे, जे शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

गोकुळच्या या अभिनव प्रयोगामुळे बायोगॅसपासून मिळणाऱ्या स्लरीचे सोनं होत असून, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळत आहे.

Next Article