Big Breaking: 30% रेशनकार्डधारकांचे धान्य होणार बंद… तुम्ही यामध्ये आहात का?
Ration Card News:- राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी ही एक मोठी बातमी असून, स्वस्त धान्य योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने अनेक महिन्यांपासून यासाठी जनजागृती केली असली तरी, अद्याप राज्यातील 30% लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
त्यामुळे, ई-केवायसी न करणाऱ्या कुटुंबांना स्वस्त धान्याचा पुरवठा थांबवण्यात येईल, असा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे. ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे, मात्र अद्याप काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. राज्यात सध्या 70% लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे.
या जिल्ह्यांमध्ये ई केवायसी प्रक्रिया कमी
पुणे जिल्हा 54.42% संख्येसह सर्वात मागे असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, परभणी (39.83%), बीड (38.08%), नागपूर (37.87%), नांदेड (37.33%), धुळे (36.89%), धाराशिव (36.44%), जळगाव (36.04%), नंदुरबार (35.38%), लातूर (35.04%), हिंगोली (34.58%) आणि सिंधुदुर्ग (34.19%) या जिल्ह्यांत देखील ई-केवायसी अपूर्ण आहे.
सर्वाधिक ई केवायसी झालेले जिल्हे
ठाणे जिल्ह्यात 76.59% लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर भंडारा आणि वर्धा (76.49%), गोंदिया (73.19%), चंद्रपूर (73.07%), नाशिक (72.01%) आणि छत्रपती संभाजीनगर (71.48%) या जिल्ह्यांत चांगली प्रगती दिसून आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेसाठी प्रशासनाने सुरुवातीला 1 नोव्हेंबर 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली होती, मात्र ती वेळोवेळी वाढवून आता 15 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ई केवायसी कुठे करावे?
शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असून, जर ती वेळेत पूर्ण केली नाही, तर स्वस्त धान्य योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन 4G ई-पॉस मशीनद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी. सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की, 15 मार्चनंतर ई-केवायसी न करणाऱ्या कुटुंबांना स्वस्त धान्य मिळणार नाही, त्यामुळे उशीर न करता ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी स्वस्त धान्य योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवायचा असेल, तर तातडीने ई-केवायसी करा आणि या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता टाळा.