For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

फक्त 15 हजारात सुरु होतो केळी पावडर बनवण्याचा व्यवसाय ! महिन्याकाठी होणार लाखो रुपयांची कमाई, कसा सुरु करणार व्यवसाय?

09:33 PM Dec 31, 2024 IST | Krushi Marathi
फक्त 15 हजारात सुरु होतो केळी पावडर बनवण्याचा व्यवसाय   महिन्याकाठी होणार लाखो रुपयांची कमाई  कसा सुरु करणार व्यवसाय
Banana Powder Making Business
Advertisement

Banana Powder Making Business : शेतमालाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत. पण जर शेतकऱ्यांनी शेतमालावर प्रक्रिया केली आणि शेतमालावर प्रक्रिया करून बाय प्रॉडक्ट बाजारात विकले तर त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. फक्त शेतकरीच नाही तर शेतमालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग कोणीही सुरू करू शकतो.

Advertisement

दरम्यान जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशाच एका व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण केळी पावडर बनवण्याच्या व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. खरंतर केळी पावडरला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. बीपी कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी, लहान मुलांसाठी तसेच पाचनशक्ती स्ट्रॉंग बनवण्यासाठी केळी पावडर चे सेवन केले जाते.

Advertisement

चेहऱ्यासाठी देखील केळीची पावडर फायदेशीर ठरते. म्हणून तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना कमी गुंतवणुकीत अधिक फायदा कमवायचा असेल त्यांच्यासाठी हा व्यवसाय परफेक्ट ठरणार आहे. केळी पावडर बनवण्याचा व्यवसाय अवघ्या पंधरा ते वीस हजार रुपयात सुरू करता येतो आणि यातून चांगली कमाई देखील होते.

Advertisement

कसा सुरु करणार व्यवसाय?

Advertisement

केळी पावडर बनवण्यासाठी दोन मशीन लागतात. हे मशीन खरेदी करून तुम्ही तुमच्या घरातूनही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या घरात व्यवसायासाठी जागा असेल तर तुम्हाला दुसरीकडे गाळा घेण्याची गरज भासणार नाही. या व्यवसायासाठी तुम्हाला बनाना ड्रायर मशीन आणि मिक्चर मशीन असे दोन मशीन लागणार आहेत. हे मशीन तुम्ही www.indiamart.com या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता. ऑफलाइन मार्केटमध्ये देखील तुम्हाला हे मशीन सहज उपलब्ध होऊन जातील. आता आपण केळी पावडर नेमकी कशी बनते याची प्रोसेस थोडक्यात समजून घेऊयात.

Advertisement

केळी पावडर कशी बनवली जाते

केळी पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळीची हिरवी फळे सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने स्वच्छ करा. नंतर केळी हाताने सोलून घ्या आणि लगेच सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवा. यानंतर, फळांचे लहान तुकडे करा. नंतर केळीचे तुकडे 60 अंश सेल्सिअस तापमानात गरम हवेच्या ओव्हनमध्ये 24 तास सुकविण्यासाठी ठेवले जातात. जेणेकरून केळीचे तुकडे पूर्णपणे कोरडे होतील. यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. बारीक पावडर तयार होईपर्यंत बारीक करा.

खर्च किती अन कमाईचं गणित कस आहे?

केळीपासून तयार केलेली भुकटी फिक्कट पिवळ्या रंगाची असते. तयार पावडर पॉलिथिनच्या पिशवीत किंवा काचेच्या बाटलीत पॅक करता येते. केळी पावडर बनवण्याचा खर्च खूपच कमी आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला फक्त पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करावे लागू शकतात. या व्यवसायासाठी जास्तीत जास्त 50000 पर्यंतचा खर्च येऊ शकतो. पण बाजारात या प्रॉडक्ट ला मोठी मागणी आहे आणि ही पावडर 800 ते 1000 रुपये किलो दराने विकली जाते. जर तुम्ही रोज 5 किलो केळी पावडर बनवली तर तुमचा रोजचा नफा 3500 ते 4500 रुपये होईल.

Tags :