Ativrushti Nuksan Bharpai: शेतकरी हो, सरकारकडून मोठी मदत जाहीर! तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? तुमचा जिल्हा आहे का यादीत?
Crop Damage Compansation:-.खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांतील पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. या पार्श्वभूमीवर सरकारने बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना एकूण 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या निधीचे वितरण विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असून, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
या कालावधीतील झालेल्या नुकसानी पोटी मिळणार मदत
शासनाने नुकताच यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचे ठरवले आहे. या निर्णयांतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी अनुक्रमे 109 आणि 2730 शेतकऱ्यांना मदत मिळणार असून, यासाठी 3 लाख 2 हजार आणि 9 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांना 3 लाख 25 हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील 61 बाधित शेतकऱ्यांना 1 लाख 21 हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांना 5 लाख 2 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
अमरावती विभागासाठी मंजूर निधी
अमरावती विभागासाठी देखील मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील 155 बाधित शेतकऱ्यांसाठी 89 लाख 17 हजार रुपये तर अकोला जिल्ह्यातील 14,706 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 73 लाख रुपये वाटप होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 925 शेतकऱ्यांना 48 लाख, बुलढाणा जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार 296 शेतकऱ्यांना 300 कोटी 35 लाख, आणि वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांसाठी 47 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पुणे आणि नाशिक विभागातील जिल्हे आणि मंजूर निधी
पुणे आणि नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठीही मदतीचा निर्णय घेतला असून, सातारा जिल्ह्यातील 932 शेतकऱ्यांसाठी 68 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील 8,199 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 5 लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 60 लाख रुपये मंजूर झाले आहेत. नाशिक विभागात, नाशिक जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील 1,541 शेतकऱ्यांसाठी 93 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांसाठी 36 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1,540 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी रुपये आणि अहमदनगर जिल्ह्यातील 1,224 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.
नागपूर विभागातील जिल्हे आणि मंजूर निधी
नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 12,970 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 76 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांसाठी 17 लाख रुपये, तसेच नागपूर जिल्ह्यातीलच 3,933 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 84 लाख रुपये वितरित केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील 2,685 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 39 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, एकूण सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्य सरकारने ही मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, संबंधित जिल्ह्यांमध्ये लवकरच या निधीचे वितरण करण्यात येईल.