For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! 'या' शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वे; वेळापत्रक कसे राहणार, कोणत्या स्टेशनवर थांबणार ?

03:08 PM Oct 10, 2024 IST | Krushi Marathi
अहिल्यानगर  बेलापूर  कोपरगाव येथील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज    या  शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वे  वेळापत्रक कसे राहणार  कोणत्या स्टेशनवर थांबणार
Ahmednagar Railway News
Advertisement

Ahmednagar Railway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील अहिल्यानगर, बेलापूर आणि कोपरगावमार्गे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी 14 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने चालवली जाणार आहे.

Advertisement

यामुळे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने उपराजधानी नागपूर येथील दीक्षाभूमीला हजेरी लावणाऱ्या अनुयायांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

दरम्यान, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याबाबतही आज आपण डिटेल माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कस राहणार वेळापत्रक

Advertisement

सोलापूर-नागपूर विशेष गाडी ( गाडी क्रमांक 01029) ही धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने चालवली जाणारी विशेष काळजी अहिल्यानगर, बेलापूर कोपरगाव मार्गे धावणार आहे.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील या तिन्ही स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे. यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

रेल्वे प्रशासन आणि सांगितल्याप्रमाणे ही विशेष गाडी 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता सोलापूरहून निघून, दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता नागपुरात पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

Railway प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे ही विशेष गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर थांबवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

यानुसार या गाडीला कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनी येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे.

Tags :