कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Agriculture News: नितीन गडकरींची मोठी घोषणा! विदर्भात धवल क्रांतीची नवी सुरुवात…शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा

12:06 PM Mar 17, 2025 IST | Krushi Marathi

Agriculture News:- विदर्भातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली असून, मदर डेअरी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादन तुलनेने कमी आहे. मात्र, मदर डेअरीच्या माध्यमातून दूध उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. १६) या प्रकल्पाचा शुभारंभ करताना विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले. मराठवाडा दुग्ध उत्पादक संघटनेचा प्रारंभ, धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन, तसेच बुटीबोरी येथे मदर डेअरीच्या मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला.

Advertisement

या कार्यक्रमाला ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी. पी. देवानंद आणि मराठवाडा दुग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री गडकरी म्हणाले की, २०१६ पासून मदर डेअरी आणि राज्य सरकारने मिळून दूध उत्पादन वाढविण्याच्या दिशेने धवल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. गडचिरोलीला नक्षलवादामुळे विकासाची गती मंदावली होती. अशा परिस्थितीत राज्य सरकारने मदर डेअरीसोबत सामंजस्य करार करून हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे.

Advertisement

मदर डेअरीची भूमिका महत्त्वाची

गडकरी यांनी विदर्भातील महिला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मदर डेअरी प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. विदर्भात हरियाणा, पंजाब, गुजरात आणि राजस्थानातून मोठ्या प्रमाणावर गायी आणल्या जातात, मात्र त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. मदर डेअरीशी जोडलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पाच चांगल्या गायींची जोपासना केल्यास दूध उत्पादनात मोठी वाढ होईल. स्थानिक स्तरावर जास्त दूध देणाऱ्या गायींची पैदास केल्यास विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल, असेही गडकरी म्हणाले.

पशुखाद्याच्या उपलब्धतेसाठीही मदर डेअरीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी गडकरी यांनी केली. विदर्भात कापसाची सरकी, तूर चुरी आणि मका मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या संसाधनांचा उपयोग करून जिल्हानिहाय पशुधन विकसित केले तर शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य किफायतशीर दरात उपलब्ध होऊ शकते. तसेच, नेपिअर ग्रासच्या माध्यमातून वर्षभर हिरवा चारा उपलब्ध केल्यास दूध उत्पादनात मोठी वाढ होईल.

Advertisement

मदर डेअरीच्या माध्यमातून नागपूरच्या प्रसिद्ध संत्रा बर्फीचे मार्केटिंग होणे आवश्यक आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. शुद्ध संत्रा पल्पपासून तयार होणाऱ्या या बर्फीच्या विक्रीतून विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा मिळेल. तसेच गडचिरोली आणि वाशीम या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही त्यांनी मदर डेअरीला केले. विदर्भातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले

Advertisement

Next Article