शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी मिळणार इतक्या हजाराचे भरीव अनुदान ! अर्ज सुरु झालेत
आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, आणि म्हणूनच शेतीच्या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. या शेतकरी हिताच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते, यात शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी देखील सरकारकडून अनुदान दिले जात असून आज आपण याच पाईपलाईन योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. नमस्कार मी…. आणि तुम्ही पाहत आहात कृषी मराठी हे आमचं नवं यूट्यूब चैनल.
मंडळी, शेतीसाठी शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा करावी लागते आणि यासाठी बहुसंख्य शेतकरी बांधव पाईपलाईन करतात, पण पाईपलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या निधीची आवश्यकता भासते आणि म्हणूनच शासनाकडून शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिले जाते. सरकार पाईपलाईनसाठी आवश्यक असणाऱ्या पीव्हीसी तसेच एचडीपी पाईपसाठी हजारो रुपयांचे अनुदान देत आहे.
आतापर्यंत या योजनेचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. दरम्यान आता या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे, ते म्हणजे शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत, अर्थात ज्यांचे नाव लॉटरीमध्ये आले आहे अशा शेतकऱ्यांना आता सरकारकडून मॅसेज पाठवले जात आहेत.
म्हणून आता ज्या शेतकऱ्यांना याचे मॅसेज मिळाले आहेत त्यांनी लवकरात लवकर पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून मॅसेज पाठवण्यात आले आहेत त्या शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊयात. मंडळी ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून मेसेज मिळत आहेत त्यांनी पुढील सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
जर वेळेत प्रक्रिया पूर्ण झाली नाही, म्हणजेच आवश्यक कागदपत्रे अपलोड केली नाहीत तर अनुदानाचा लाभ मिळवणे कठीण होऊ शकते. खरेतर महाडीबीटी पोर्टलच्या लॉटरी प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्याने गेल्या काही काळापासून शासनाच्या अनेक योजना रखडल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे सुर उमटत होते. मात्र, आता हळूहळू योजनांची लॉटरी जाहीर होऊ लागली आहे.
त्यात सिंचन विभागाच्या पाईपलाईन योजनेची लॉटरीही जाहीर झाली असून, ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला आहे, त्यांनी पुढील सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. यामुळे जर तुम्हालाही मॅसेज आला असेल तर तुम्हीही लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा आणि कोटेशन तत्काळ अपलोड करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळेल.
पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावी लागेल आणि त्याचे बिल पुन्हा महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल. त्यामुळे वेळेवर योग्य प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाबाबत बोलायचं झालं तर सध्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 50 ते 100 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाते. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी एचडीपी पाईपसाठी 50 रुपये प्रति मीटर तर पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना जवळपास 15 हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
मंडळी, तुम्हाला हा माहिती पूर्ण व्हिडिओ कसा वाटला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार.