शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कापूस, तूर, गहू, टोमॅटोसहित विविध पिकांचे 18 वाण देश पातळीवर प्रसारित, वाचा सविस्तर
Agriculture News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकाच्या 18 जातींना देशपातळीवर प्रसारित करण्यात आले आहे.
देशाची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये हे वाण अधिसूचित करण्यात आले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर पी.जी पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या गहू, भात, कापूस, तूर, टोमॅटो, मका, ज्वारी, करडईसहित विविध पिकांच्या वाणाला देशपातळीवर प्रसारित करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, आता आपण राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अन संपूर्ण देशासाठी अलीकडेच प्रसारित करण्यात आलेल्या या संपूर्ण 18 वाणांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
2024 मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे कोणते वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झालेत
तूर - फुले पल्लवी
मूग - फुले सुवर्ण
गहू - फुले अनुराग
कापूस - फुले शुभ्रा
भात - फुले कोलम
मका - फुले उमेद व फुले चॅम्पियन
ज्वारी - फुले पूर्वा
करडई - फुले भूमी
उडीद - फुले राजन
राजमा - फुले विराज
ऊस - फुले १५०१२
घेवडा - फुले श्रावणी
टोमॅटो - फुले केसरी
चेरी टोमॅटो - फुले जयश्री
घोसाळे - फुले कोमल
वाल - फुले सुवर्ण
मेथी - फुले कस्तुरी