फक्त 5-10 मिनिटात एकरभर जमिनीवरील पिकांवर फवारणी करणारे टॉप 3 ड्रोन ! खरेदीसाठी सरकारकडून अनुदानही मिळणार
Agriculture Drone News : भारतातील शेतीचा व्यवसाय आता पूर्णपणे हायटेक झाला आहे. शेतीमध्ये आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. ट्रॅक्टर, ड्रोन सारख्या यंत्रांमुळे शेतीचा व्यवसाय फारच सोपा झाला आहे.
कृषी ड्रोन मुळे फवारणीचे कामे आता शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटात पूर्ण करता येत आहेत. यामुळे ज्या कामासाठी शेतकऱ्यांना आधी तासंतास कष्ट करावी लागत होती ती कामे आता अवघ्या काही मिनिटात होतात आणि शेतकऱ्यांना आता फारशी मेहनतही घ्यावी लागत नाही.
महत्त्वाचे म्हणजे कृषी ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून अनुदान सुद्धा दिले जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन सारख्या अपडेटेड तंत्रज्ञानासोबत जोडण्यासाठी सरकारकडून ड्रोनवर अनुदान दिले जात आहे तसेच ड्रोनसाठी प्रशिक्षण देखील दिले जात आहे.
ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 4 लाख रुपयांची मदत आणि 40 टक्के अनुदान दिले जात आहे. कृषी ड्रोन खरेदीसाठी, कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण आणि चाचणी संस्था, आयसीएआर संस्था,
कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठांना या तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी 100% पर्यंत अनुदान दिले जात आहे. दरम्यान आता आपण देशातील टॉप तीन कृषी ड्रोन ची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केटी-डॉन ड्रोन : हा कृषी ड्रोन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. क्लाउड इंटेलिजेंट मॅनेजमेंटने सुसज्ज असलेले हे कृषी ड्रोन कमाल शंभर लिटर मिश्रण वाहून नेऊ शकते. म्हणजेच एकाच वेळी 100 लिटर औषधचे द्रावण यामध्ये राहू शकते.
10 ते 100 लिटर द्रवपदार्थ वाहून नेण्याची याची क्षमता पाहता हा ड्रोन शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. एवढेच नाही तर याच्या मशीनमध्ये जे नकाशा नियोजन कार्य आणि हँडहेल्ड स्टेशनच्या मदतीने शेतकरी त्यांच्या शेताचे मोजमाप सुद्धा करू शकतात. याच्या किमती बाबत बोलायचं झालं तर याची किंमत ही तीन लाखाच्या आसपास आहे.
आयजी ड्रोन अॅग्री : या ड्रोन ची किंमत हे चार लाखांच्या आसपास आहे. हे ड्रोन हवेत वेगाने फिरते. यामध्ये फवारणीसाठी 5 ते 20 लिटर कीटकनाशके आणि द्रव खते मावतात. भारतातील सर्वोत्कृष्ट ड्रोनच्या यादीत याचाही समावेश होतो.
कार्बन फायबर कृषी ड्रोन : हा कॅमेरा असणारा ड्रोन शेतकऱ्यांच्या फारच कामाचा आहे. याची किंमत ही तीन लाख 60 हजाराच्या आसपास आहे. या ड्रोनमध्ये पिकांवर फवारणीसाठी 10 लिटरपर्यंत कीटकनाशके आणि इतर द्रवपदार्थ मावू शकतात. हा देखील भारतातील सर्वोत्कृष्ट ड्रोनपैकी एक आहे.