For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Agriculture Business Idea: घरच्या घरी उद्योग सुरू करून मिळवले दरमहा 40 हजारांचे उत्पन्न… तुम्हीही कमी खर्चात सुरू करा नवा व्यवसाय

09:09 AM Mar 07, 2025 IST | Krushi Marathi
agriculture business idea  घरच्या घरी उद्योग सुरू करून मिळवले दरमहा 40 हजारांचे उत्पन्न… तुम्हीही कमी खर्चात सुरू करा नवा व्यवसाय
mushroom
Advertisement

Agriculture Business Idea:- मेघालयातील रेमंड बी. मारवेन यांनी कमी गुंतवणुकीत मोठा व्यवसाय उभा करून अळिंबी बीज उत्पादनाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. अळिंबी उत्पादनासाठी शुद्ध आणि दर्जेदार बीज (स्पॉन्स) मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते, मात्र मेघालयासारख्या दुर्गम भागात त्याचीची उपलब्धता फार कमी होती.

Advertisement

अळिंबी उत्पादक आणि स्पॉन्स पुरवठादार यामध्ये मोठी तफावत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी यामध्ये व्यवसाया संधी शोधली. पूर्वी या भागातील शेतकऱ्यांना अळिंबी उत्पादनासाठी बीज सहज उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे त्यांना बाहेरून महागड्या किमतीत ते खरेदी करावे लागत होते.

Advertisement

रेमंड यांनी हीच संधी ओळखून अळिंबी बीज उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. औषधशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या उमियम येथील संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांना अळिंबी बीजाच्या मागणीची कल्पना आली आणि त्यांनी या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला.

Advertisement

अशाप्रकारे केली व्यवसायाची सुरुवात

Advertisement

शेती आणि कृषी क्षेत्रातील संधींचा अभ्यास करून त्यांनी 'फार्मर्स फर्स्ट' प्रकल्पांतर्गत सात दिवसांचे 'अळिंबी बीज उत्पादन आणि उद्योजकता विकास' प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात त्यांना अळिंबी बीज उत्पादनाच्या शास्त्रीय आणि तांत्रिक माहितीबरोबरच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्यांनी कमी खर्चात उत्पादन सुरू करण्यासाठी आपल्या घरातील दोन खोल्यांमध्ये छोटी प्रयोगशाळा उभारली. त्यांनी घरगुती उपकरणांचा वापर करून सुरुवातीला छोट्या प्रमाणावर बीज निर्मिती सुरू केली.

Advertisement

निर्जंतुकीकरणासाठी घरगुती प्रेशर कुकर, लसीकरणासाठी साधे हूड यांचा वापर करत त्यांनी ५०० मिलिलिटर कल्चर मीडियापासून उत्पादन सुरू केले. या प्रक्रियेत त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि ९१.३ टक्के यश दरासह २३ मदर स्पॉन पॅकेट तयार झाले. या बीजातून त्यांनी पुढे २३० व्यावसायिक स्पॉन पॅकेटची पहिली बॅच तयार केली.

आजच्या घडीला व्यवसायाची उत्तम प्रगती

आजच्या घडीला रेमंड आठवड्यातून सुमारे ५०० स्पॉन पॅकेट तयार करत आहेत. त्यांची विक्री स्थानिक बाजारपेठेत १०० रुपये प्रति किलो दराने केली जाते. अळिंबी बीज निर्मितीच्या व्यवसायाबरोबरच ते टिश्यू कल्चर आणि ताज्या अळिंबी विक्रीतही लक्ष घालत आहेत. अल्प गुंतवणुकीत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वीपणे वाढवला असून, सुरुवातीला केवळ ९० हजार रुपये गुंतवून त्यांनी या व्यवसायाची पायाभरणी केली. या भांडवलातून त्यांनी आवश्यक यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधा उभारल्या,

तसेच काही कामगारांचीही व्यवस्था केली. प्रारंभी काही महिन्यांतच त्यांनी स्पॉन आणि ताज्या अळिंबींच्या विक्रीतून मासिक ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. आता त्यांनी आपल्या व्यवसायात अधिक गुंतवणूक करत आधुनिक उपकरणे खरेदी केली आहेत. त्यांचे पुढील ध्येय म्हणजे आपल्या उम्समू गावाला अळिंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध करणे.
अळंबी उत्पादनासोबत इतर शेती उत्पादनांना प्राधान्य

याशिवाय, त्यांनी एकात्मिक शेती प्रणालीचा अवलंब करत वराह पालन, मत्स्यपालन, गांडूळ खत उत्पादन आणि भाजीपाला शेतीही सुरू केली आहे. यामुळे त्यांच्या शेतीतील उत्पादनांमध्ये विविधता येत आहे आणि आर्थिक स्थैर्यही मिळत आहे. त्याचबरोबर, पर्यटकांसाठी होमस्टे सुविधा सुरू करून त्यांनी आपल्या शेतातील उत्पादनांचा वापर करून घरगुती अन्नपुरवठा करण्याची सुविधाही दिली आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे गावातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली असून, त्यांनीही शेतीपूरक उद्योगांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. रेमंड यांचा हा प्रयोग कृषी क्षेत्रातील तरुणांना नवीन दिशा देणारा ठरत आहे.