विभक्त झालेल्या भावांनी एकत्रित शेती करायला सुरुवात केली आणि 3 एकर जमिनीची केली 47 एकर जमीन
Farmer Success Story:- कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर ती एकट्याने करण्यापेक्षा जर काही जणांनी एकत्र येऊन केली तर ती सहजासहजी होते व त्यामध्ये यश देखील मिळते हे आपल्याला दिसून येते. कारण एकीचे बळ हे खूप वेगळे असते व यामध्ये खूप अशी ताकद आणि अफाट अशी क्षमता देखील दडून बसलेली असते.
फक्त एकीचे महत्त्व आपल्याला ओळखता येणे खूप गरजेचे असते. एकीचे बळ म्हणजेच एकीची क्षमता काय असते हे आपल्याला अनेक बाबतीत दिसून येते. त्यामुळे एकीचे बळ काय असते किंवा एकीमध्ये काय क्षमता असते?
याचे महत्त्व जर आपल्याला ओळखायचे असेल तर आपल्याला नाशिक जिल्ह्यातील गिरणारे या गावचे कारभारी आणि निवृत्ती थेटे या दोन भावांचे उदाहरण घेता येईल.या विभक्त झालेले दोन भाऊ शेती करण्यासाठी एकत्र आले आणि तीन एकर जमिनीमध्ये फळबागाचे नियोजन करून तब्बल 47 एकर जमीन खरेदी केली.
विभक्त झालेले भाऊ शेती करण्यासाठी एकत्र आले आणि तीन एकर जमिनीच्या उत्पन्नातून खरेदी केली 47 एकर जमीन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जवळील गिरणारे या गावचे कारभारी आणि निवृत्ती थेटे या दोन भावांकडे वाट्याला प्रत्येकी दीड एकर जमीन आलेली होती
जरी ते विभक्त झाले होते परंतु दोन्ही भावांनी मुलांसह एकत्र येण्याचा व एकत्रित शेती करण्याचा निर्णय घेतला. दोघ भाऊ मिळून तीन एकर जमीन त्यांच्याकडे होती व या जमिनीमध्ये त्यांनी फळबागाचे नियोजन करण्याचे ठरवले. सुरुवातीला शेतीमध्ये त्यांनी टोमॅटो, डाळिंब तसेच पपई व पेरू या पिकांची लागवड केली.
असे करता करता आज त्यांच्याकडे 47 एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी नऊ एकर क्षेत्रात तैवान पिंक पेरूच्या सात हजार पाचशे रोपांची लागवड दोन वर्षांपूर्वी केलेली होती व पहिल्याच उत्पादनातून त्यांना एक कोटी 50 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले.
तसेच मागच्या वर्षांपूर्वी त्यांनी केळी लागवड केली व पहिल्या दहा महिन्यातच 100 टन केळीचे उत्पादन मिळवले व थेट दुबईला केळी निर्यात केली होती. इतकेच नाही तर पपई देखील लागवड केलेली होती व पपईचे दर्जेदार उत्पादन घेऊन मुंबई येथे विक्रीसाठी त्यांनी पाठवली होती. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये सुंदर असे फळबागांचे नियोजन केलेले आहे.
शेतीच्या प्रत्येक तुकड्याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केला आहे. शेताच्या बांधांवर आणि जमिनीमध्ये तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बाजूला त्यांनी पाचशे नारळाची झाडे देखील लावली असून आतापर्यंत 35 रुपये दराप्रमाणे चार ते पाच हजार शहाळ्यांची विक्री त्यांनी केली आहे.
अशा पद्धतीने फळबागेतून या भावांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी मिळवली आहे. भविष्यामध्ये शेतीमध्ये खूप वेगळे बदल करण्याची त्यांची इच्छा असून हीच शेती पाहण्यासाठी विदेशी पर्यटक येतील असे कृषी पर्यटन स्थळ निर्माण करायची इच्छा देखील रामदास थेटे यांनी व्यक्त केली.यावरून आपल्याला दिसून येते की,एकीचे बळ काय असते व त्यातून काय फायदा होऊ शकतो.