मार्केटमध्ये आले धमाल थ्रेशर मशीन! डिझेलविना करेल काम व पिकांची मळणी होईल सोपी
Thressure Machine:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आता यांत्रिकीकरण होऊ लागले आहे व शेतीच्या पूर्व मशागती पासून तर काढणीपर्यंत अनेक प्रकारचे कामे आता यंत्रांच्या माध्यमातून केली जातात. यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ देखील मोठ्या प्रमाणावर वाचण्यास मदत होते. यांत्रिकीकरणामुळे शेतीची अनेक कामे मोठ्या प्रमाणावर सुलभ झाले आहेत.
शेतीच्या जर अनेक किचकट कामांच्या बाबतीत जर आपण बघितले तर यामध्ये भातासारख्या पिकाची मळणी खूप जिकिरीचे असते व याकरिता शेतकरी प्रामुख्याने थ्रेशर मशीनचा वापर करतात. थ्रेशर मशीनने भाताची मळणी करायची किंवा एक कुठलाही पिकाची मळणी करायचे राहिले म्हणजे आपल्याला त्यासाठी खर्च करावा लागतो. परंतु आता बाजारामध्ये असे एक यंत्र आलेले आहे की ते चालवण्यासाठी डिझेल किंवा पेट्रोलची गरज भासणार नाही व ते हाताने चालवता येणार आहे व भात पिकाची मळणी उत्तम पद्धतीने या माध्यमातून करता येणार आहे.
मार्केटमध्ये आले पायाने व हाताने चालवता येणारे थ्रेशर मशीन
तुम्हाला जर आता तांदळाचे दाणे न फुटता भात पिकाची मळणी करायची असेल तर आता बाजारामध्ये एक मळणी यंत्र आले आहे व हे चालवण्यासाठी डिझेल किंवा पेट्रोल सारख्या इंधनाची गरज भासणार नाही.हे यंत्र अगदी हाताने किंवा पायाने चालवता येणार आहे व या यंत्राच्या साह्याने धान्याची काढणी करताना कुठल्याही पद्धतीने नुकसान होणार नाही व उत्पादनाचे गुणवत्ता देखील चांगले राहील.
किमतीच्या दृष्टिकोनातून देखील हे यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व परवडणाऱ्या दरामध्ये शेतकरी ते घरी आणू शकतात.विशेष म्हणजे शेतकऱ्यांना हे यंत्र ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून देखील खरेदी करता येणार आहे. तुम्हाला जर या यंत्राबद्दल अधिकची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ट्रेड इंडिया, गोल्ड मॉडेल मशीन, टूल्स व्हिला आणि एसपी इंजिनिअरिंग सारख्या अनेक वेबसाईटवर यासंबंधीची माहिती मिळवू शकतात.
या साइटवर हे अतिशय सहजरीत्या तुम्हाला उपलब्ध होऊ शकते व तुम्हाला पूर्ण माहिती देखील मिळू शकते. जर तुम्हाला हे यंत्र खरेदी करायचे असेल तर त्याची किंमत 8000 पेक्षा देखील कमी आहे. परंतु यामध्ये तुम्ही नेमके कोणते वैशिष्ट्य असलेले यंत्र घेत आहात त्याच्यावर त्याची किंमत अवलंबून आहे.
इतक्या कमी किमतीमध्ये अशा पद्धतीने मळणी यंत्र मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा पेट्रोल आणि डिझेल वरचा खर्च वाचणार आहे किंवा भाडेतत्त्वासाठी द्यावा लागणारा पैसा वाचून मळणीचे काम सोपे होणार असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.